| | | |

आयसीसीला २० कोटींचा ऑनलाईन गंडा ? | cricket marathi
दुबई; : ऑनलाईन पेमेंट आणि बँकिंगचा जसजसा वापर वाढत आ हे तसतसे ऑनलाईन आर्थिक फसवणुकीचे प्रकारही वाढत आ हे त. तुमच्या- आमच्या सारखे सामान्य लोक तर रोजच ऑनलाईन फ्रॉडचे बळी पडतात. मात्र, आता मोठमोठ्या संस्था ज्यांच्याकडे अशा फ्रॉडला प्रतिबंध घालण्यासाठी आवश्यक असलेली साधनसामुग्री आणि तंत्रज्ञान आ हे त्यादेखील अशा ऑनलाईन फ्रॉडला बळी पडत आ हे त.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीला २.५ मिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास २० कोटींचा आनलाईन चुना लागला असण्याची शक्यता आ हे. आयसीसीची अशा प्रकारे ऑनलाईन फसवणूक ही पहिल्यांदाच झाली • नसून गेल्या काही काळापासून जवळपास चारवेळा त्यांना असा चुना लागला आ हे.

दुबईमधील कार्यालयात बसणाऱ्या अधिकाऱ्यांच्या ध्यानीमनी नसताना गुरुवारपर्यंत ते ऑनलाईन फसवणुकीचे शिकार होत हो ते. दरम्यान, आयसीसीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले आ हे. त्यांनी याप्रकरणी अजून चौकशी सुरू असल्याचे कारण दिले. मात्र, टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेतील एका पार्टीला पेमेंट झा’ले आ हे. ही पार्टी आयसीसीचे व्हेंडर असल्याचा दावा के-ला जात आ हे.

फसवणूक करणाऱ्याने आयसीसीच्या मेल आयडीसारखाच ई-मेल आयडी वापरला होता*. या घोटाळ्यानंतर आयसीसी सदस्याने मोठा धक्काच बसला. आयसीसी सदस्य देशांची जवळपास २० कोटी रुपये रक्कम गायब झाली आ हे. युरोपमधील आयसीसीच्या अस्थायी सदस्य देशाने प्रतिक्रिया दि ली की, आयसीसीमध्ये असे काही घडेल असे मला वाटले नव्हते. वन- डे दर्जा प्राप्त असलेल्या अशा संघटनांना वर्षाला ५ लाख ते १ लाख डॉलर्स अनुदान मिळत असते. सध्या या प्रकरणी आयसीसी सर्व स्तरातून चौकशी करत आ हे.

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *