| | | |

ऑस्‍ट्रेलियाच्‍या डेव्‍हिड वॉर्नरने दिले निवृत्तीचे संकेत : म्‍हणाला, “माझे क्रिकेटमधील…” | cricket marathi
cricket marathi news डेस्‍क : ऑस्‍ट्रेलियाचा दिग्‍गज क्रिकेटपटू डेव्‍हिड वॉर्नर याने निवृत्तीचे संकेत दिले आ हे त. ” २०२३ हे वर्ष माझ्‍यासाठी आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमधील शेवटचे वर्ष असू शक ते”, असे त्‍याने म्‍हटलं आ हे. मात्र एकीकडे निवृत्तीचे संकेत देत असतानाच २०२४ मधील टी-20 विश्‍वचषक स्‍पर्धेचे आयोजन अमेरिका किंवा वेस्‍ट इंडिजमध्‍ये व्‍हावे, अशी अपेक्षाही त्‍याने व्‍यक्‍त के ली आ हे. ( David Warner hints at retirement )

David Warner hints at retirement : माझ्‍या कारकिर्दीतील शेवटचे वर्ष अ’सेल

यासंदर्भात ‘स्‍काय स्पोर्ट्स’शी बोलताना डेव्‍हिड वॉर्नर याने निवृत्तीचे संकेत दिले. तो म्‍हणाला की, “सध्‍या मी २०२४ च्‍या टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धेवर लक्ष केंद्रीत के-ले आ हे. ही स्‍पर्धा वेस्ट इंडिज आणि अमेरिकेमध्‍ये व्‍हावी, अशी माझी इच्‍छा आ हे. येथे ऑस्‍ट्रेलियाला विजय मिळवून देणे माझे स्‍वप्‍न आ हे; पण बहुधा २०२३ हे माझ्‍या कारकिर्दीतील शेवटचे वर्ष अ’सेल.”

१३ वर्षांच्‍या कारकीर्दीत वॉर्नरने केल्‍या आ हे त अनेक अविस्‍मरणीय खेळी

गेली १३ वर्ष वॉर्नर आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये खेळत आ हे. आतापर्यंत १०१ कसोटी सामन्यांमध्ये त्‍याने ४६.२९ च्या सरासरीने ८ हजार १३२ धावा केल्‍या आ हे त. कसोटीमध्‍ये त्‍याने २५ शतके आणि ३४ अर्धशतके फटकावली आ हे त. कसोटीमध्‍ये ३३५ धावांची खेळी ही त्‍याची  वैयक्तिक सर्वोत्‍तम आ हे. वॉर्नर याने १४१ वनडे सामने खेळले आ हे त. यामध्‍ये त्‍याने ४५.१६ सरासरीने ६,००७ धावा केल्‍या आ हे त. वनडे सामन्‍यात १७९ ही त्‍याची सर्वोत्‍कृष्‍ट खेळी ठरली असून, या फॉर्मेटमध्‍ये त्‍याने १९ शतके आणि १७ अर्धशतके झळकावली आ हे त.

टी-20 फॉर्मेटमध्‍ये वॉर्नरने ९९ सामन्‍यांमध्‍ये ३२.८८च्‍या सरासरीने २ हजार ८९४ धावा केल्‍या आ हे त. टी-२०मध्‍ये त्‍याच्‍या नावावर एक शतक आणि २४ अर्धशतके आ हे त. या फॉर्मेटमध्‍ये १०० धावांची सर्वोत्‍कृष्‍ट खेळीही त्‍याच्‍या नावावर आ हे. वॉर्नर हा २०१५ मधील वनडे विश्‍वचषक स्‍पर्धा आणि २०२१ मधील T20 विश्वचषक स्‍पर्धेच्‍या ऑस्‍ट्रेलिया संघात सहभागी होता*. या दोन्‍ही स्‍पर्धांमध्‍ये त्‍याने संघासाठी बहुमूल्‍य योगदान दिले हो ते.

९ फेब्रुवारीपासून भारताविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्‍पर्धा होणार आ हे. या स्‍पर्धेसाठी वॉर्नर ऑस्‍ट्रेलिया संघात सहभागी होणार आ हे. भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा ९ फेब्रुवारीपासून नागपुरात सुरू होई ल. या दौऱ्यात चार कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने होणार आ हे त. ९ फेब्रुवारीपासून नागपूरच्या व्हीसीए मैदानावर पहिला कसोटी सामना सुरु होणार आ हे.

हेही वाचा :

 

 

 

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *