| | | |

ऑस्ट्रेलियात सुरू झा’लाय युनायटेड कप टेनिसचा थरार | cricket marathi
सध्या क्रीडाशौकिनांना अगदी सुगीचे दिवस अनुभवायला मिळत आ हे त, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार ना’ही! क्रिकेट वर्ल्डकपनंतर फुटबॉल वर्ल्डकप आणि आता टेनिस सांघिक विजेतेपद स्पर्धा..!

गुरुवारपासून (29 डिसेंबर) सुरू झा’लेल्या या स्पर्धेत 18 देशांचे जागतिक दर्जाचे बहुतेक सर्व खेळाडू पहिली युनायटेड कप स्पर्धा जिंकण्यासाठी आपले कसब पणास लावण्यासाठी सज्ज झा’ले आ हे त. स्वतःच्या देशाची मान उंचावण्यासाठी पुरुष आणि महिला खेळाडू सर्वोत्कृष्ट खेळ करणार हे उघड आ हे. त्यामुळे टेनिस रसिकांना सर्वोच्च पातळीचा खेळ पाहायला मिळणार आ हे. ऑस्ट्रेलियातील पर्थ, ब्रिस्बेन आणी सिडनी येथे 29 डिसें. ते 4 जाने. दरम्यान फेरीतील सामने हो तील आणि सिडनी येथे 6 ते 9 जानेवारीला उपांत्य फेरीपासून पुढील सामने खेळले जातील. या स्पर्धेसाठी बक्षीस रक्कम आ हे 15 दशलक्ष अमेरिका डॉलर्स. स्पर्धेतील कामगिरीनुसार खेळाडूंना 500 पर्यंत गुणदेखील मिळणार आ हे त. त्यामुळे याला विशेष महत्त्व आ हे.

जगातील अव्वल राफेल नदाल, स्टिफानोस त्सिस्तिपास, अलेक्सझंडर झ्वेरेव्ह, ग्रीगोर डीमिट्रोव्ह, केस्पर रूड, तसेच इगा स्विटेक, पेट्रा क्विंटोवा, पॉला बडोसा, मारिया सक्कारी करोलीन गर्शिया, जेसीका पेगुला अशा बलाढ्य खेळाडूंचे कसब आणी रॅकेटची जादू व नजाकत पाहायला मिळणे ही मोठी पर्वणीच आ हे. दोन देशांच्या संघातील लढत प्रत्येकी दोन पुरुष आणि महिला खेळाडू आणी एक मिश्र दुहेरी अशी होई ल. पहिल्या दिवशी दिवसाच्या सत्रात ग्रीस संघाने 1 व अमेरिकेने 2 सामने जिंकले. मॅडिसन कीज आणी टेलर फ्रीटज यांनी एकेरीचे सामने सहज जिंकले. तसेच इंग्लंड 1, इटली 1 असे विजयी सामने झा’ले. स्तिफनोस स्तितीपास, कॅमेरून नुरी यांनी संघास विजयी सलामी दि ली.

उदय बिनीवाले

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *