| | | |

कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांनी लैंगिक शोषण के ल्याचा आरोप | cricket marathi
नवी दिल्ली; :  जगभरात देशाचे नाव चमकवणार्‍याभारतीय कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाच्या मनमानीविरोधात आवाज उठवला आ हे. यातील धक्कादायक बाब म्हणजे महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषण के ल्याचा आरोप के-ला आ हे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आ हे. बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगाट यांच्या नेतृत्वाखाली अनेक कुस्तीपटूंनी जंतरमंतर मैदानावर बुधवारी निदर्शने सुरू के ली आ हे त.

हे खेळाडू राष्ट्रीय महासंघाच्या मनमानी नियमांना विरोध करत आ हे त. महासंघ त्यांना डावलण्याचा प्रयत्न करत असल्याचे कुस्तीपटूंचे म्हणणे आ हे. देशासाठी पदक जिंकूनही त्यांना पद्धतशीरपणे डावलले जात आ हे.

हे आ हे वादाचे कारण

कुस्ती महासंघाने विशाखापट्टणम येथील वरिष्ठ गट अजिंक्यपद स्पर्धेसाठी नव्या पंचांची नियुक्ती के ली हो ती. तथापि, नवीन पंचांना नियम माहीत नव्हते. त्यांनी चुकीचे निर्णय दिले. त्यामुळे खेळाडूंमध्ये प्रचंड असंतोष असून यावर वादही झा’ला. बजरंग पुनियाचे वैयक्तिक प्रशिक्षक सुजित मान यांना एका सामन्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित के-ले. परिणामी महासंघाने त्यांना निलंबित के-ले. सोनीपत येथील वरिष्ठ शिबिरात मान यांना स्थान देण्यात आ लेले ना’ही. महासंघाच्या अशा मनमानीमुळे कुस्तीगिरांनी निदर्शने सुरू के ली आ हे त. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप के-ला आ हे. ते खासदार असून त्यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍याला आव्हान दिले हो ते. तेव्हाही ते चर्चेत हो ते. विनेश फोगाट म्हणाली, ‘अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह आणि प्रशिक्षक राष्ट्रीय शिबिरांमध्ये महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ क’रतात. अनेक महिला कुस्तीपटूंनीही याबाबत तक्रारी के ल्या आ हे त.

…तर मला फाशी द्या : बृजभूषण शरण सिंह

जर माझ्यावरील आरोप खरे ठरले तर मला भर चौकात फाशी द्या, अशा शब्दांत भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खा. बृजभूषण शरण सिंह यांनी आपल्यावरील आरोपांचा इन्कार के-ला आ हे.

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *