कोल्हापूर : खासबागेत पुन्हा घुमणार शड्डू | cricket marathi
कोल्हापूर, cricket marathi वृत्तसेवा : कुस्तीपंढरी कोल्हापुरात बर्याच कालावधीनंतर बेमुदत निकाली कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आ ले आ हे. कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन (केएसए) चे चिफ पेट्रन शाहू छत्रपती महाराज यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त या मैदानाचे आयोजन करण्यात आ ले असून पहिल्या क्रमांकासाठी महान भारत केसरी पै. सिकंदर शेख (गंगावेस तालीम) विरुद्ध भारत केसरी पै. गौरव मच्छीवाला (पंजाब) यांच्यात लढत रंगणार आ हे. शनिवारी (दि. 7) दुपारी 3 वाजल्यापासून राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानात ही स्पर्धा होणार आ हे. मुख्य मोठ्या पाच कुस्त्यांसह 107 चटकदार कुस्त्यांसाठी तब्बल 15 लाख रुपयांच्या बक्षिसांची घोषणा कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने करण्यात आ ली.
बक्षीस समारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख खा. शरद पवार, पालकमंत्री दीपक केसरकर, उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार, आमदार यांच्या हस्ते होणार आ हे. यानिमित्ताने शाहू छत्रपती महाराज यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार चांदीची गदा देऊन करण्यात येणार आ हे.
कुस्ती मैदानात महाराष्ट्रासह कर्नाटक, पंजाब, दिल्ली येथील मल्ल सहभागी होणार आ हे त. कुस्ती शौकीनांनी मैदानाचा लाभ घेण्याचे आवाहन तालीम संघाचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत के-ले. यावेळी शहर अध्यक्ष व्ही.बी. पाटील, सरचिटणिस अॅड. महादेव आडगुळे, हिंदकेसरी विनोद चौगुले, आर.के. पोवार, अदिल फरास, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, संयोजन समिती प्रमुख अशोक पोवार, केएसए चे सचिव माणिक मंडलिक, प्रताप घोरपडे आदी उपस्थित हो ते.
कुस्ती मैदानातील प्रमुख लढती अशा
क्रमांक 1 : महानभारत केसरी पै. सिकंदर शेख (गंगावेस तालीम) विरुद्ध भारत केसरी पै. गौरव मच्छीवाला (पंजाब)
पै. सिकंदर शेख याने कमी वयात देशभरातील कुस्त्या जिंकल्या आ हे त. जस्सा पट्टीसारख्या अनेक मल्लांना चितपट के-ले आ हे. पै. गौरव मच्छीवाला याने भारताचे प्रतिनिधित्व करून अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजविल्या आ हे त. बि—जपाल फागवाडा, माऊली जमदाडे, जस्सा पट्टी अशा अनेक मल्लांना पराभूत के-ले आ हे.
क्रमांक 2 : उपमहाराष्ट्र केसरी पै. प्रकाश बनकर (गंगावेस तालीम) विरुद्ध पै. सतनाम सिंग (गुरुभवानी आखाडा, पंजाब) पै. प्रकाश बनकर याने पहिल्यांदाच उपमहाराष्ट्र केसरीच्या मैदानात उतरून हा मानाचा किताब पटकाविला आ हे. विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारा हा पैलवान आ हे. पै. सतनाम सिंगला मातीतील कुस्तीचा मोठा अनुभव आ हे. राष्ट्रीय स्पर्धांमध्ये तो पंजाब राज्याचे प्रतिनिधित्व कर तो.
वर्षभर विविध उपक्रम
शाहू छत्रपती महाराज यांच्या अमृतमहोत्सव वाढदिवसानिमित्त पुढील वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आ हे. सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक यांसह प्रबोधनपर, इतिहास विषयक उपक्रमांचा यात समावेश असणार आ हे, अशी माहिती माजी आमदार मालोजीराजे व माजी खा. संभाजीराजे यांनी यानिमित्ताने दि ली.
🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬