| | | |

कोल्हापूर : फुटबॉल हंगामाचा आज किक ऑफ | cricket marathi
कोल्हापूर; cricket marathi वृत्तसेवा :  तमाम फुटबॉलप्रेमींची प्रतीक्षा अखेर संपली असून सन 2022-23 या वर्षातील फुटबॉल हंगामास मंगळवारपासून (27 डिसेंबर) प्रारंभ होत आ हे. शाहू छत्रपती फुटबॉल लीगने हंगाम सुरू होई ल. कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन (केएसए) तर्फे या छत्रपती शाहू स्टेडियमवर जय्यत तयारी करण्यात आ ली आ हे. मैदानाची आखणी, रंगरंगोटीसह विविध कामे पूर्ण करून मैदान पुढील हंगामासाठी सज्ज करण्यात आ ले आ हे.

लीग सामन्याचे उद्घाटन संस्थेचे पेट्रन इन चीफ शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली व पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते दुपारी 3 वाजून 45 मिनिटांनी होई ल. यावेळी मनपाच्या प्रशासक सौ. कादंबरी बलकवडे, शहर डीवायएसपी मंगेश चव्हाण व केएसएचे पदाधिकारी उपस्थित असणार आ हे त. लीग स्पर्धेत वरिष्ठ गटातील 16 संघांचा सहभाग असणार आ हे. यात सुपर 8 व सीनियर 8 या दोन गटांतर्गत दररोज दोन याप्रमाणे एकूण 56 सामने होणार आ हे त.

फुटबॉल मैदानाच्या पश्चिम बाजूच्या बैठक व्यवस्थेसाठी तिकीट दर 20 रुपये तर पूर्व बाजूच्या बैठक व्यवस्थेसाठी तिकीट दर 10 रुपये असणार आ हे. पश्चिमेकडील प्रेक्षक गॅलरीतील खुर्चीसाठी 50 रुपये तिकीट दर असून याची विक्री लाईफ मेंबर कक्षाच्या बाहेर के ली आ हे.
लीग सामने शांततेत पार पाडणेसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन के.एस.ए.च्या वतीने करण्यात आ ले आ हे.

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *