ठाण्याच्या समीर गायकवाड ‘महाराष्ट्र श्री’ | cricket marathi

रत्नागिरी, cricket marathi वृत्तसेवा : स्वामी माऊली बहुउद्देशीय सेवा चॅरिटेबल ट्रस्ट पुरस्कृत, महाराष्ट्र राज्य हौशी शरीरसौष्ठव संघटना व रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेतर्फे 72 वी राज्यस्तरीय अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धा रत्नागिरीतील स्वा. सावरकर नाट्यगृहात घेण्यात आ ली. पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त झा’लेल्या स्पर्धेत ठाण्याच्या समीर गायकवाड याने मानाचा ‘महाराष्ट्र श्री’ किताब प’टकावला.
25 आणि 26 डिसेंबर अशी दोन दिवस ही स्पर्धा घेण्यात आ ली. एकूण सहा गटांत झा’लेल्या या स्पर्धेत राज्यभरातील साडेतीनशे स्पर्धक सहभागी झा’ले हो ते. प्रत्येक गटातील स्पर्धा अत्यंत रोमहर्षक झाली. दोन्ही दिवस प्रचंड प्रतिसादात स्पर्धा पार पडली. 26 डिसेंबर रोजी स्पर्धेचा समारोप झा’ला. ‘महाराष्ट्र श्री’ समीर संजय गायकवाड याला रोख रुपये 51 हजार आणि मानाची ट्रॉफी देऊन गौरवण्यात आ ले.
जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते त्याचा सन्मान झा’ला. ‘महाराष्ट्र किशोर’ हा किताब ईश्वर प्रदीप ढोलम याने प’टकावला. ‘महाराष्ट्र उदय’ किताब अजिंक्य पवार तर ‘महाराष्ट्र श्रीमान’ किताब स्वप्निल सुरेश वाघमारे याने प’टकावला. ‘महाराष्ट्र फिटनेस’ हा किताब विश्वनाथ पुजारी तर ‘महाराष्ट्र कुमार’ हा किताब जगन्नाथ जाधव याने प’टकावला.
सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रुपये 21 हजार आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आ ले. दोन्ही दिवस या स्पर्धेला रत्नागिरीकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬