पावसामुळे झाडाखाली अर्धा तास आसरा घे’तला : स्विआटेक | cricket marathi
प्रथम मानांकित, जगातील अव्वल खेळाडू पोलंडच्या इगा स्विआटेकने कोलंबीयाच्या कॅमीला ओसोरियाला सहज पराभूत करून ऑस्ट्रेलियन ओपन च्या तिसर्या फेरीत प्रवेश के-ला.
विजयानंतर तीने प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधीशी मोकळे पणाने संवाद साधताना खेळा बरोबरच काही व्यक्तिगत गोष्टी उघड करून धमाल उडविली.
इगा म्हणाली, आकडेवारी दिसते त्याप्रमाणे खेळ किंवा सामना सोपा न’व्हता. कॅमिला लढावू आ हे. तिने मला कोणताही पॉईंट सहज मिळू दिला ना’ही, परंतु मी भक्कम हो ते आणि जिंकल्याचा अर्थातच आनंद आ हे त.
दिलखुलासपणे बोलताना ती पुढे म्हणाली, मला निसर्गाची, फिरण्याची आवड आ हे. काल येथे बाहेर फिरताना अचानक पाऊस आल्याने जवळच एका झाडाखाली अर्धा तास थांबून राहावे लागले.
तसेच 2 वर्षांपूर्वी जे माझे आवडते गाणे हो ते ते आता मी बदलले आ हे आणि सतत गुणगुणत असते. नवीन गाणे माझ्यासाठी लकी आ हे.
22 वेळा ग्रँड स्लॅम विजेता आणी प्रथम मानांकित राफेल नदालला दुसर्या फेरीतच स्पर्धेबाहेर फेकून देताना अमेरिकेच्या मकेंझी मॅकडोनाल्ड ने 6-4, 6-4, 7-5 असे सरळ तीन सेट मधे पराभूत करून मेलबर्न पार्क मधे टेनिस भूकंप के-ला असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरु नये.
आज नदाल सुरवातीपासूनच तंदुरुस्त आणी जोशात दि’सला ना’ही. दुसर्या सेट मध्ये थांबून त्याने वैद्यकीय सहाय्य देखील घे’तले.
इथे हवामान कसेही बदलते.. काल दिवसभर प्रचंड उकाड्या नंतर सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी प’डल्या.
आज दिवस भर ढगाळ वातावरण आणि अधून मधून पावसाची रिमझिम सुरु आ हे. स्टेडीयम चे छत बंदिस्त करता येत असल्याने मुख्य सामने विना व्यत्यय सुरु आ हे त.
🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬