| | | |

राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचा आजपासून थरार! | cricket marathi
नगर, cricket marathi वृत्तसेवा : यजमान नगर विरुद्ध हिंगोली, मुंबई शहर विरुद्ध रायगड अशा पुरुषांत, तर कोल्हापूर विरुद्ध नगर, पुणे विरुद्ध परभणी अशा महिलांतील लढतीने 70 व्या वरिष्ठ गट पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आज मंगळवारपासून बिगुल वाजणार आ हे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. च्या मान्यतेने अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेच्या विद्यमाने दि.27 ते 30 डिसेंबर या कालावधीत या स्पर्धेचे आयोजन के-ले आ हे. वाडिया पार्क क्रीडा संकुल, स्वस्तिक चौक, टिळक रोड येथे 6 मॅटच्या क्रीडांगणार हे सामने खेळविण्यात येतील. नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते सायंकाळी 4 वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होणार आ हे.

यंदा या स्पर्धेत सामन्यांच्या वेळेचे नियोजनदेखील करण्यात येणार असून सामने कोणत्या दिवशी व किती वाजता हो तील? या संबंधीचे वेळा-पत्रक सर्व संबंधित जिल्हा संघांना 4 दिवस अगोदरच वितरित करण्यात आ ले आ हे. या अगोदर 1999 साली सांगली येथे झा’लेल्या अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत एका मैदानावर व अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील बालेवाडी येथे झा’लेल्या कबड्डी स्पर्धेत दोन मैदानांवर वेळेचे नियोजन करून सामने खेळविण्यात आ ले हो ते.

या स्पर्धेत अर्जुन पुरस्कार शांताराम जाधव व सचिन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहा क्रीडांगणावर वेळेचे नियोजन करण्याचा प्रयत्न करण्याचा आयोजकांचा मानस आ हे. या स्पर्धेत देखील बाद फेरीपासून रिव्ह्यू घेण्याचा अधिकार संबंधित संघांना देण्यात आ ला आ हे.

या स्पर्धेतूनच महाराष्ट्राचा पुरुष व महिला गटाचा संघ निवडण्यात येणार असून हा संघ राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल. यामुळेच प्रो-कबड्डी गाजविणार्‍या खेळाडूंचा खेळ नगरकरांना जवळून पाहण्याची संधी मिळणार आ हे. या स्पर्धेतील सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्पोर्टवोट या यू-ट्यूब वाहिनीवर करण्यात येणार आ हे.

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *