राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा : महाराष्ट्राची मुले सेमीफायनलमध्ये | cricket marathi

बोकारो (झारखंड), : महाराष्ट्राच्या मुलांनी 32 व्या किशोर-किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली. झारखंड राज्य कबड्डी असो.च्या विद्यमाने बोकारो येथील एमजीएम माध्यमिक शाळेच्या मैदानावर सुरू असलेल्या उपउपांत्य फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राने अत्यंत चुरशीच्या लढतीत गतविजेत्या राजस्थानचा प्रतिकार 41-35 असा मोडून काढत सेमीफायनलमध्ये आगेकूच के ली. महाराष्ट्राची उपांत्य लढत बिहारशी होई ल.
पहिल्या सत्रात 12-23 असे 9 गुणांनी पिछाडीवर पडलेल्या महाराष्ट्राने दुसर्या सत्रात धुवाँधार खेळ करीत हा विजय साकारला. दुसर्या सत्रात महाराष्ट्राने गिअर बदलला. महाराष्ट्राच्या संदेश बिल्ले, गणेश टेकाम, श्रीधर कदम यांनी दुसर्या सत्रात चौफेर चढाया करीत भराभर गुण घेण्याचा सपाटा लावला. त्याला सारंग रोकडे यांनी भक्कम बचाव करीत मोलाची साथ दि ली. शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणार्या या सामन्यात महाराष्ट्राने राजस्थानच्या पारड्यातील विजय आपल्या बाजूला खेचून आणला.
या अगोदर सकाळच्या सत्रात झा’लेल्या उपउपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्राने हिमाचल प्रदेशचे आव्हान 46-30 असे परतवून लावले. महाराष्ट्राच्या मुलांनी सुरुवातीपासून आक्रमक धोरण ठेवत विश्रांतीला 22-14 अशी आघाडी घेत आपला इरादा पक्का के-ला होता*. उत्तरार्धात तोच पवित्रा कायम ठेवत 16 गुणांच्या मोठ्या फरकाने ही किमया साधली. दिघू दहातोंडे, श्रीधर कदम, संदेश बिल्ले यांच्या झंझावाती चढाया त्याला संदेश भोसले यांची पकडीची मि’ळालेली भक्कम साथ यामुळे हा विजय सोपा झा’ला.
🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬