| | | |

राष्ट्रीय महिला अजिंक्यपद बुद्धिबळ : साक्षी, आश्रा संयुक्त आघाडीवर | cricket marathi
कोल्हापूर, cricket marathi वृत्तसेवा : कोल्हापूरच्या संजय घोडावत युनिव्हर्सिटी येथे चालू असलेल्या 48 वी राष्ट्रीय महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेच्या चौथ्या फेरीनंतर आठवी मानांकित आंतरराष्ट्रीय महिला मास्टर औरंगाबादची साक्षी चितलांगे व विसावी मानांकित मुंबईची आंतरराष्ट्रीय महिला मास्टर आश्रा मखिजा या दोघी चार गुणांसह संयुक्त आघाडीवर आ हे त.

स्विस लीगने एकूण 11 फेर्‍यांत होणार्‍या या स्पर्धा 5 जानेवारीपर्यंत चालणार आ हे त. स्पर्धेत गुरुवारी अग्रमानांकित आंतरराष्ट्रीय महिला ग्रँडमास्टर दिल्लीची वंतिका अग्रवाल, द्वितीय मानांकित गतविजेती महिला ग्रँडमास्टर नागपूरची दिव्या देशमुख, ग्रँडमास्टर मेरी आना गोम्स (पेट्रोलियम स्पोर्टस् बोर्ड) व मुंबईची विश्वा शहा या चौघीजणी साडेतीन गुणांसह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आ हे त. आंतरराष्ट्रीय मास्टर पेट्रोलियम स्पोर्टस् बोर्डची सौम्या स्वामीनाथन व पाचवी मानांकित अर्जुन पुरस्कार विजेती आंतरराष्ट्रीय मास्टर गोव्याची भक्ती कुलकर्णीसह एकूण 16 जण तीन गुणांसह संयुक्तपणे तृतीय स्थानावर आ हे त.

पहिल्या पटावर महाराष्ट्राच्या महिला फिडे मास्टर वृषाली देवधर व आंतरराष्ट्रीय महिला मास्टर साक्षी चितलांगी यांच्यात इंग्लिश ओपनिंग प्रकाराने सुरू झा’लेल्या प्रेक्षणीय लढतीत दोघांनीही तोडीस तोड चाली रचत डावावर वर्चस्व राखण्याचा प्रयत्न के-ला; परंतु अनुभवी साक्षीने अंतिम पर्वात उंट व घोड्याच्या सुंदर चाली रचत डावावर निर्णायक वर्चस्व ठेवत 47 व्या चाली अखेर वृषालीला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. दुसर्‍या पटावर पश्चिम बंगालची ब्रिस्टी मुखर्जी व मुंबईची आश्रा मखिजा यांच्यातील बर्डस् ओपनिंगने झा’लेल्या प्रदीर्घ लढतीत डावाच्या मध्यात आश्नाने वर्चस्व राखत वजिराकडील बाजूने जोरदार हल्ला करत ब्रिस्टीचा बचाव भेदला व अखेर 56 व्या चालीला विजय संपादन के-ला.

तिसर्‍या पटावर अग्रमानांकित आंतरराष्ट्रीय मास्टर वंतिका अग्रवाल व महाराष्ट्राची ऋतुजा बक्षी यांच्यातील स्लॉव्ह डिफेन्सने रंगलेल्या डावात सुरुवातीपासून आक्रमक चाली रचणार्‍या वंतिकाला ऋतुजाने अचूक प्रत्युत्तर देत डावात समतोल राखण्यात यश मिळवले हो ते; परंतु अनुभवी वंतिकाने हत्ती व उंटाच्या नेत्रदीपक चाली रचत डावावर निर्णायक वर्चस्व राखले व 55 व्या चालीस ऋतुजावर मात के ली.

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *