| | | |

संघातील स्थान गृहित धरू नका; रोहित शर्माने दिला सहकार्‍यांना इशारा | cricket marathi

मुंबई, : श्रीलंकेविरुद्धच्या यशस्वी मालिका विजयानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास आता अधिक वाढला आ हे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ 18 जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध वन-डे मालिका खेळणार आ हे. पहिला सामना हैदराबादमध्ये होणार आ हे. भारताचा कर्णधार रोहित शर्माला माहीत आ हे की, टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध 3-0 असा विजय मि’ळवला असला तरी न्यूझीलंड संघाला साधारण समजून चालणार ना’ही. कोणीही संघातील स्थान गृहित धरू नये, खेळपट्टी पाहूनच अंतिम संघ निवडला जा’ईल, असे रोहित शर्मा प्लेईंग इलेव्हनबाबत म्हणाला.

आगामी एकदिवसीय विश्वचषकासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आ हे. ही विश्वचषक स्पर्धा भारतातच खेळवली जाणार आ हे. श्रीलंके-ला 3-0 अशा गुण फरकाने हरवून भारताने 2023 ची दमदार सुरुवात के ली, तीच लय टीम इंडिया न्यूझीलंडसमोर कायम ठेवू इच्छित आ हे. भारताने श्रीलंकेविरुद्धचा शेवटचा एकदिवसीय सामना 317 धावांनी जिंकला, जो एक ऐतिहासिक विजय होता*. कोणत्याही संघाचा हा सर्वात मोठा विजय होता*. आता भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आ हे. न्यूझीलंड क्रिकेट संघ पाकिस्तानला हरवून भारतात येत आ हे, तो एक मजबूत संघ आ हे. न्यूझीलंडला हरवणे सोपे नसेल. त्यांना अजिबात कमी लेखून चालणार ना’ही.

खेळपट्टी पाहिल्यानंतर प्लेईंग इलेव्हन ठरवू

पहिल्या एकदिवसीय सामन्याबाबत रोहित शर्मा याने सांगितले की, लोकेश राहुल आणि अक्षर पटेल यांनी या मालिकेतून ब्रेक घे’तला आ हे, दोघेही लग्न करणार आ हे त. हे दोन्ही खेळाडू संघाचा महत्त्वाचा भाग आ हे त, पण त्यांच्या जागेवर कोण खेळणार हे अजून ठरलेले ना’ही. खेळपट्टी पाहिल्यानंतर तो त्याच्या अंतिम अकराच्या संघाचे नियोजन करण्यात येईल. त्यामुळे न्यूझीलंड विरुद्ध भारताचा संघ नेमका कोणता अ’सेल, हे पाहणे उत्सुकतेचे अ’सेल. पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर होणार आ हे. तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेनंतर तीन टी-20 सामन्यांची मालिका होणार आ हे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड वन-डे मालिकेचे वेळापत्रक

पहिला वन-डे – बुधवार, दि. 18 जानेवारी
दुसरा वन-डे – शनिवार, दि. 21 जानेवारी
तिसरा वन-डे – मंगळवार, दि. 24 जानेवारी
(सर्व सामने दुपारी 1.30 वा. सुरू हो तील)

हेही वाचा…

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *