सिडनी क्रिकेट स्टेडियमवर 501 रिची बेनॉ | cricket marathi

5 जानेवारी – ऑस्ट्रेलिया वि. साऊथ आफ्रिका, सिडनी मैदानावरील वर्षातील पहिल्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस होता*. हा दिवस रिची डे असा गौरवाने संबोधण्यात येतो.
रिची बेनॉ हे ऑस्ट्रेलियाचे महान खेळाडू आणि कर्णधार हो ते. निवृत्तीनंतर ते क्रिकेट समालोचन करीत असत. जगातील एक अव्वल आणि उत्कृष्ट समलोचक असा लौकिक त्यांनी आदराने मिळविला होता*. कसोटी सामन्यात 2000 धावा आणि 200 बळी घेणारे ते पहिले अव्वल खेळाडू. कुशल कर्णधार, महान खेळाडू, उत्कृष्ट समालोचक आणि एक उत्तम व्यक्तिमत्त्व अशा गुणामुळे त्यांच्याकडे मोठ्या आदराने पाहायले जायचे.
1952 ते 1964 या काळात रिची बेनॉ ऑस्ट्रेलियाकडून खेळले. तसेच 1958 ते 64 त्यांनी कर्णधारपद देखील भूषविले. 10 एप्रिल 2015 रोजी त्यांचे निधन झा’ले. त्यानंतर या लोकप्रिय आणि श्रेष्ठ खेळाडूला मानवंदना देण्यासाठी त्यांच्याविषयी आदर भावना व्यक्त करण्यासाठी 501 क्रिकेट रसिक थेट रिची बेनॉ यांच्या सारखा पेहराव – ग्रे, बेज सूट, टाय, सिल्व्हर विग परिधान करून हातात माईक, वाद्ये वाजवत सिडनी स्टेडियमवर प्रत्येक वर्षाच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसर्या दिवशी न चुकता हजर राहतात. याप्रसंगी नयन मनोहर रंगीबेरंगी फुलांची सजावट के-लेली असते.
कुतूहलचा भाग म्हणजे 501 रसिक इथे का जमतात?
रिची बेनॉ यांचा टोपी क्र 190 + त्यांनी खेळलेले सामने 63+ घे’तलेले बळी 248 = 501. 501 रसिकांचा, हुबेहूब रिची बेनॉ यांच्या पेहरावात, हातात ध्वनिक्षेपक घेऊन गाणी गात उत्साहाने रिची बेनॉ यांना आदरांजली वाहण्याचा प्रसंग अगदी आगळावेगळा आणि खास व लक्षवेधी आ हे हे निश्चित.
उदय बिनीवाले
🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬