Asia Cup Archery : आशिया चषक तिरंदाजीमध्ये भारताला 5 सुवर्णसह दहा पदके | cricket marathi

शारजाह, : आशिया चषक तिरंदाजी (Asia Cup Archery) चॅम्पियनशिपमध्ये भारताने दमदार कामगिरी करताना 5 सुवर्णपदकांसह दहा पदकांची कमाई के ली. भारताने पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांत ही चमक दाख’वली. महिला गटात आदिती स्वामी आणि ऐश्वर्या शर्मा यांनी सांघिक सुवर्णपदक जिंकले. तर वैयक्तिक प्रकारात प्रगतीने सुवर्ण, आदितीने रौप्य, परनीत कौैरने कांस्यपदक मिळवले.
कंपाऊंड गटात प्रियांशने सांघिक आणि वैयक्तिक अशी दोन सुवर्णपदके आपल्या नावावर के ली. प्रियांशच्या संघात ओजस देवताळे आणि मानव जाधव यांचा समावेश होता*. रिकर्व्ह सांघिक गटात मृणाल चौहान, आकाश, पार्थ आणि प्रशांत साळुंखे यांनी सुवर्णपदक मिळवले. याच प्रकारात प्रशांत साळुंखे याने वैयक्तिक कांस्य तर तिशा पुनियासोबत मिश्र गटाचे रौप्यपदक मिळवले.
पदकाचे मानकरी : (Asia Cup Archery)
महिला संघ (कंपाऊंड) : प्रगती, आदिती गोपीचंद स्वामी, ऐश्वर्या शर्मा- सुवर्णपदक
पुरुष टीम कॅटेगरी (कंपाऊंड) : प्रियांश , ओजस प्रवीण देवताळे, मानव गणेशराव जाधव – सुवर्णपदक
पुरुष वर्ग (व्यक्तिगत प्रकार) कंपाऊंड : प्रियांश – सुवर्णपदक, ओजस प्रवीण देवताळे- रौप्यपदक.
महिला वर्ग (व्यक्तिगत कॅटेगरी) कंपाऊंड : प्रगती – सुवर्णपदक, अदिती – रौप्यपदक, परनीत कौर – कांस्यपदक
🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬