औरंगाबादच्या बाजारात झाला ‘प्रेमाचा राडा’; एका बॉयफ्रेंडसाठी 2 अल्पवयीन गर्लफ्रेंड भिडल्या; तरुणाने मात्र.
दोघींचाही बॉयफ्रेंड एकच होता आणि त्याला मिळवण्यासाठी त्या बाजारात एकमेकांशी फाइट करू लागल्या. त्यानंतर बॉयफ्रेंडने जे केलं ते सगळं धक्कादायक आहे.
प्रेम मिळवण्यासाठी काही लोक कोणत्याही हद्दीपर्यंत जाऊ शकतात. एखाद्या तरुणीवर बऱ्याच तरुणांचं प्रेम जडलं की ते त्या तरुणीला आपली गर्लफ्रेंड बनवण्यासाठी काय काय करतात हे तुम्हाला काही वेगळं सांगण्याची गरजच नाही.
पण यात तरुणीही मागे नाहीत. एखादा तरुण आवडला तर त्याला बॉयफ्रेंड बनवण्यासाठी त्या कोणत्या थरापर्यंत सुध्दा जाऊ शकतात, हेच दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. औरंगाबादमधील बाजारात प्रेमाचा राडा पाहायला मिळाला.
पैठणच्या बाजारात भररस्त्यात दोन अल्पवयीन मुली एकाच तरुणासाठी भिडल्या. दोघींचाही बॉयफ्रेंड एकच होता आणि त्याला मिळवण्यासाठी त्या बाजारात एकमेकांशी फाइट करू लागल्या. त्यानंतर बॉयफ्रेंडने जे केलं ते तर धक्कादायक आहे.
एक तरुण एका मुलीसोबत बस स्टँडवर उभा होता. याची माहिती तरुणाच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडला मिळाली. ती लगेच तिथं आली. आपल्या बॉयफ्रेंडसोबत दुसऱ्या मुलीला पाहून तिच्या तळपायाची आग ही मस्तकात गेली. दोघीही आमनेसामने आल्या आणि सुरुवातीला तूतू-मैंमैं झाली. दोघींमध्ये सुरुवातीला वाद झाले. पण हळूहळू हा वाद मारहाणीपर्यंत पोहोचला.
दोघीही एकमेकांशी फाइट करू लागल्या. दोघी ज्याच्यासाठी भांडत होत्या त्या बॉयफ्रेंडसमोरच दोघींची मारामारी झाली. दोघींचं भांडण पाहून बॉयफ्रेंड इतका घाबरला की तो तर तिथून पळून गेला.
त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही मुलींना पोलीस ठाण्यात आणलं. पीटीआयच्या रिपोर्टनुसार पोलिसांनी सांगितलं की, ही घटना गेल्या बुधवारची आहे. सकाळी सकाळी बस स्टॅंडवर दोन्ही मुली आपसात भांडत होत्या. दोघांचा बॉयफ्रेंड एकच होता आणि त्याच्यासाठी त्यांच्यात हाणामारी झाली.
पोलीस ठाण्यात आणून दोघींची समजूत काढली आणि त्यांना शांत करून, समज देऊन, त्यांची चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आलं.