| | | |

BCCI Selectors : निवड समितीच्‍या अध्‍यक्षपदी पुन्‍हा चेतन शर्मांची वर्णी | cricket marathi








cricket marathi news डेस्क : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर भारतीय क्रिकेट संघाची नवीन निवड समिती जाहीर करण्‍यात आ ली आ हे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय ) आज ( दि. ७ ) ५ सदस्यीय पुरुष वरिष्ठ निवड समितीची नावे जाहीर के ली. चार सदस्‍य पूर्णपणे नवीन आ हे त; परंतु, निवड समितीच्‍या अध्‍यक्षपदी पुन्‍हा एकदा चेतन शर्मा यांचीवर्णी लागली आ हे, ‘बीसीसीआय’ने  प्रसिद्धीपत्रकाद्वारे नवीन निवड समिती सदस्‍यांच्‍या नावांची घोषणा के ली.

चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील मागील निवड समितीच्या कार्यकाळात भारताला टी -२० विश्वचषक स्पर्धेत दोनदा पराभवाला सामोरे जावे लागले हो ते, त्यानंतर ‘बीसीसीआय’ने नवीन निवड समिती स्थापन करण्याची घोषणा के ली. आता पुन्हा एकदा निवड समितीची धुरा  चेतन शर्मा यांच्‍या हाती सोपविवण्‍याचा निर्णय ‘बीसीसीआय’ने घे’तला आ हे. (BCCI Selectors)

क्रिकेट सल्लागार समितीने निवड समिती सदस्‍यांसाठी ६०० हून अधिक अर्जांपैकी ११ जणांची निवड के ली हो ती नंतर त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. अखेर ११ पैकी ५ जणांची नावांची घोषणा आज करण्‍यात आ ली. चेतन शर्मा यांची अध्‍यक्षपदी तर माजी कसोटीपटू सलील अंकोला, शिव सुंदर दास, सुब्रतो बॅनर्जी आणि श्रीधरन शरद यांची सदस्‍यपदी निवड झाली आ हे.  (BCCI News)

BCCI Selectors :  चेतन शर्मा यांना खुर्ची वाचवण्यात यश

मागील निवड समितीचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच ‘बीसीसीआय’ने नवीन निवड समिती नेमण्याची घोषणा के ली हो ती. अशा परिस्थितीत यावेळी पूर्णपणे नवे चेहरे पाहायला मिळतील, असे मानले जात हो ते. तथापि, निवड प्रकियेसाठी  यामध्ये बराच वेळ घे’तला आणि या काळात केवळ जुनी समिती टीम इंडियाची निवड करत हो ती. १ जानेवारी 2023 रोजी ‘बीसीसीआय’ने टीम इंडियाच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी आणि २०२३ च्या विश्वचषकासाठी रोडमॅप तयार करण्यासाठी बैठक घे’तली हो ती.

हेही वाचा;









 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *