मधुमेहाच्या रुग्णांनी करावे हे उपाय, लोकांना होत आहेत फायदे
leaf of insulin plant acts as insulin for diabetic patient : मधुमेह अर्थात डायबिटिस झालेल्या रुग्णांनी कोणताही अन्न पदार्थ खाण्याआधी रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणे आवश्यक आहे.
थोडं पण कामाचं
मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी खावी ‘ही’ पानेमधुमेहाच्या रुग्णांनी कोणताही पदार्थ खाण्याआधी रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणे आवश्यकज्या पदार्थामुळे रक्तातील साखर ही एकदम वाढून तब्येतीला त्रास होईल असे पदार्थ खाणे टाळले पाहिजे.
leaf of insulin plant acts as insulin for diabetic patient : मधुमेह अर्थात डायबिटिस झालेल्या रुग्णांनी कोणताही पदार्थ खाण्याआधी रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणे हे आवश्यक आहे. ज्या पदार्थामुळे रक्तातील साखर एकदम वाढून तब्येतीला त्रास होईल असे अन्न पदार्थ खाणे टाळले पाहिजे, असे डॉक्टर सांगतात. याच कारणामुळे मधुमेह झालेले अनेक रुग्ण गोड पदार्थ खाणे हे टाळतात.
गोड खाण्याची इच्छा असते पण मधुमेहाचा त्रास वाढेल या भीतीपोटी अनेकजण इच्छा मारतात. आता अशा लोकांनी चिंता करू नये. त्यांची गोड खाण्याची इच्छा पूर्ण करूनही रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणारे एक पान आहे. हे पान मर्यादीत प्रमाणात खाल्ल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवून गोड खाण्याची इच्छा मधुमेहाचे रुग्ण पूर्ण करू शकतात.
इन्सुलिनच्या झाडाच्या पानांमध्ये कोर्सोलिक अॅसिड असते. सर्दी, खोकला, कोणत्याही स्वरुपाचे किरकोळ इन्फेक्शन, फुफ्फुसाशी संबंधित त्रास, अस्थमा असा हा आजार असलेल्यांनाही इन्सुलिनच्या झाडाचे पान खाल्ल्याने बरे वाटते. मधुमेहाच्या रुग्णांनी प्रत्येकी दोन पानांमध्ये काही मिनिटांचे अंतर राखले तर ते पाच सात पानं खाऊ शकतात.
दररोज मर्यादीत प्रमाणात इन्सुलिनची पानं खाल्ली तर रक्तातील साखरेचे प्रमाण हे नियंत्रणात राहू शकते. मधुमेहाचे रुग्ण इन्सुलिनची पानं ठेचून त्यांची पूड (पावडर) करून ती पण दररोज मर्यादीत प्रमाणात खाऊ शकतात.
इन्सुलिनच्या झाडातील पानात प्रोटिन्स, टेरपेनोइड्स, फ्लेवोनोइड्स, अँटीऑक्सिडंट, एस्कॉर्बिक अॅसिड, लोह, बी कॅरोटिन, कोरोसॉलिक अॅसिड आहे.
मधुमेहाच्या रुग्णांनी हातसडीचा तांदूळ, ओट्स, चण्याचे पीठ, टोंड दूध, मठ्ठा, पालेभाज्या, फायबर युक्त भाज्या, पपई, सफरचंद, संत्र, पेरू हे पदार्थ खावे. हे पदार्थ रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास खुप मदत करतात.
डिस्क्लेमर : प्रस्तुत मजकूर हा इंटरनेटवरून मिळवला आहे. या मजकुराची जबाबदारी आरोग्यविद्या मराठी घेत नाही. प्रस्तुत मजकुराचा प्रयोग करण्याआधी वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे आहे.