acidity in marathi

एकदा कराच हा उपाय ! Acidity दूर करण्याचे खास 7 घरगुती उपाय, बघा कमाल

Acidity Var Upay : काही घरगुती उपाय करून तुम्ही तुमच्या पचनासंबंधी समस्या Direct दूर करू शकता. हे उपाय तुम्ही मसाल्याचे किंवा तेलाचे पदार्थ खाल्ल्यावर झालेल्या डॅमेजला सुधारण्याचं नेहमीच काम करतात.

Acidity : भारतीय पदार्थांमध्ये तेल आणि मसाले भरपूर टाकले जातात आणि हे पदार्थ हवे तेवढे खाल्लेही जातात. आपल्यापैकी अनेक लोक पोटाच्या आरोग्यापेक्षा जिभेचे चोचले पुरवण्यावर जास्त भर देतात.

अशात या लोकांच्या शरीरात गॅस, पोटात जळजळ, अ‍ॅसिडिटी होणे, पोटदुखी अशा आजारांना घर करण्यास जागा मिळते. या समस्या लग्नाचा सीझन आणि उन्हाळ्यात तर अधिकच वाढतात.

अशात या समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय आम्ही तुम्हाला आता सांगणार आहोत. काही घरगुती उपाय करून तुम्ही तुमच्या पचनासंबंधी समस्या दूर करू शकता. हे उपाय तुम्ही मसाल्याचे किंवा तेलाचे पदार्थ खाल्ल्यावर झालेल्या डॅमेजला सुधारण्याचं काम करतात.

जेवणानंतर कोमट पाणी – जर तुम्हाला वाटत असेल की, मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर सकाळी तुम्हाला जुलाब होऊ नये तर लगेच जेवणानंतर कोमट पाणी नक्की प्यावं. कोमट पाण्याने पचनक्रिया वेगाने आणि सहजपणे होते.

चहा, कॉफी नाही तर ग्रीन टी आहे फायदेशीर – जेवणानंतर चहा किंवा कॉफीचं सेवन करणं फायदेशीर असतं. यात फ्लेवोनोइड भरपूर प्रमाणात असतं, जे पचनक्रियेत ऑक्सीडेटिव लोडला संतुलित करण्यासाठी अ‍ॅंटीऑक्सीडेंट हे बनवतं.

दही अ‍ॅसिडिटीमध्ये आहे फायदेशीर – आयुर्वेदात जेवण केल्यानंतर दही खाण्याचा सल्ला नेहमी दिला जातो. दह्यातसोबत भाजलेलं जीरं पचनक्रियेला ही बूस्ट करतं. दह्यात असलेल्या प्रोबायोटिक्स लॅक्टोबेसिलस बॅक्टेरिया अ‍ॅसिडिटीला कमी करण्यासोबतच आतड्यांना अन्न पचवण्यास मदत करतं.

फायबरने पोट राहतं साफ – जास्त तळलेले आणि भाजलेले पदार्थ खाल्ल्यानंतर हलकं आणि फायबरयुक्त जेवण पोटासाठी आरोग्यासाठी नेहमी चांगलं मानलं जातं. फायबरयुक्त आहार पोटाची सफाई करण्यास नेहमीच मदत करतं. तसेच तेलकट खाल्ल्यानंतर पचनक्रियेचं झालेलं डॅमेजही कंट्रोल करतं. अशात दलिया आणि ओट्सचं सेवन करावं.

ड्रायफ्रूट्सचं च करा सेवन – काजू, बदाम, पिस्ता, शेंगदाणे, किशमिश, खजूर, सुपारीसारखे ड्रायफ्रूट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळतं. याने पचनक्रिया मजबूत करण्यास मदत मिळते.

ओव्याने पोट राहते थंड – ओव्याचं पाणी जेवण केल्यानंतर गॅस, अपचन, अ‍ॅसिडिटीसाठी सर्वात जास्त वापरला जाणारा घरगुती उपाय आहे. ओवा थंड असतो. कोमट पाण्यात एक चमचा ओवा टाकून सेवन केल्यास पचनसंबंधी समस्या लगेच दूर होतात.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *