Hair fall in marathi

Hair care : आता कोंड्यामुळे नाही गळणार तुमचे केस ; करा हे घरगुती उपाय

केसातील कोंडा आणि केस गळण्याच्या अशा समस्येमुळे हैराण आहात का ? काही घरगुती उपाय करून या समस्येपासून मुक्ती मिळवू शकता.

पावसाळ्याच्या दिवसात केसांच्या समस्या (hair problems) खूप वाढतात. हवेतील ओलावा, आर्द्रतेमुळे केसही ओलसर राहतात.

केसांतील धूळ, माती, घाण आणि निघणारे तेल यामुळे कोंडा (oily dandruff) होतो. या दोन्ही गोष्टी वातावरणातील बदलांमुळे आणि आर्द्रतेमुळे हे होतात आणि कोंड्याची समस्या वाढते. याला तेलकट कोंडा ; असेही म्हटले जाते.

त्यावर वेळेवर उपाय न केल्यास त्यामुळे केस गळणे, तुटणे असे त्रासही सुरू लगेच होतात. केस गळल्यामुळे ( hair fall) किंवा ते दुभंगणे, निर्जीव होणे यामुळे केसांचा लूकही खराब होतो.

या सर्व समस्यांमुळेही तुम्हीही त्रस्त आहात का ? घरच्या घरी काही उपाय (home remedies) करून केसांच्या समस्या दूर करता तर येतील. या उपायांमुळे केसातील कोंडा तर जाईलच, पण केस पूर्वीप्रमाणे चमकदार आणि मजबूतही होतील.

हे घरगुती उपाय करून पहा आणि केसांतील समस्या दूर करा.

लिंबू व दह्याचा हेअर मास्क –

लिंबू आणि दही हे केवळ खाण्यासाठी उपयुक्त नाहीत तर त्यांचा त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठी वापर करता येतो. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, या दोन्ही पदार्थांमध्ये असे गुणधर्ण आहेत, ज्यामुळे केसांचे आरोग्य सुधारते व त्यांची गळती कमी होते.

तसेच केसातील कोंडाही जातो. हा हेअर मास्क बनवण्यासाठी एका भांड्याच थोडं दही घेऊन ते नीट फेटा व त्यामध्ये लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण नीट एकजीव करून केसांच्या मुळांना लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवा. हा हेअर मास्क आठवड्यातून एक-दोन वेळा केसांना जरुर लावा.

मेथीच्या बिया-

भारतीय स्वयंपाकघरात मेथीचे दाणे सहज मिळतील. त्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. केसांसाठीही मेथीचे दाणे उपयुक्त ठरतात. त्यासाठी थोड्या पाण्यात मेथीचे दाणे रात्रभर भिजवून ठेवावे व सकाळी ते मिक्सरमधून फिरवून त्याची पेस्ट तयार करावी.

ही पेस्ट केसांना लावून मसाज करावा. ती वाळल्यानंतर केस स्वच्छ धुवावेत. यामधील ॲंटी-फंगल आणि ॲंटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मांमुळे केसातील कोंडा कमी होतो आणि केस मजबूत व चमकदार होतात.

कडुनिंबाची पाने –

जर तुम्ही केसातील कोंड्यामुळे त्रस्त असाल तर कडुनिंबाच्या पाने वापरण्याचा घरगुती उपाय नक्की करून पहा. ॲंटी-बॅक्टेरिअल, ॲंटी-फंगल आणि ॲंटी- इन्फ्लेमेटरी गुणधर्म असलेल्या कडुनिंबाच्या पानांचे महत्व आयुर्वेदातही सांगण्यात आले आहे.

कडुनिंबाच्या पानांची पेस्ट तयार करून ती केसांना लावून ठेवावी. थोड्या वेळाने केस स्वच्छ धुवावेत. हा उपाय तुम्ही आठवड्यातून एक-दोन वेळा करू शकता. नियमित वापरानंतर अपेक्षित बदल दिसून येईल.

(टीप- या आर्टिकलमध्ये सुचवण्यात आलेले सर्व उपाय व देण्यात आलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *