Hockey WC : अर्जेंटिनाची विजयी सलामी, द. आफ्रिकेचा 1-0 ने पराभव | cricket marathi

cricket marathi news डेस्क : Hockey WC : अर्जेंटिनाने शुक्रवारी त्यांच्या सलामीच्या सामन्यात द. आफ्रिकेचा 1-0 असा पराभव करून एफआयएच पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेची विजयी सुरुवात के ली. कलिंगा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या ग्रुप ए च्या सामन्यात मिको कॅसेलाने तिसऱ्या क्वार्टरमध्ये विजयी संघासाठी गोल के-ला. या विजयासह अर्जेंटिनाने तीन गुणांची कमाई के ली.
गेल्या विश्वचषकात सातव्या स्थानावर राहिलेल्या अर्जेंटिनाने सुरुवातीच्या मिनिटांतच द. आफ्रिकेच्या गोलवर आक्रमण के-ले. द. आफ्रिकेच्या बचावपटूंनी मात्र हा प्रयत्न हाणून पाडला आणि चेंडूचा ताबा घे’तला. त्यानंतर सेन्झविझल न्युबेने चेंडू पास करत अर्जेंटिनाच्या डी मध्ये धाव घे’तली पण त्यांना गोलजाळे भेदता आ ले ना’ही. हाफ टाईम संपेपर्यंत सामना गोलशुन्य बरोबरीत रा’हिला. दोन्ही संघांच्या बचावफळीने यात मोलाची भूमिका बजावली. यानंतर अर्जेंटिनाने तिसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीपासून आक्रमणाची धार वाढवली. द. आफ्रिकेच्या गोलपोस्टवर प्रतिआक्रमण सुरूच ठेवले. याचा फायदा घेत कॅसेलाने तोस्कानीच्या पासवर शानदार गोल के-ला.
चौथ्या क्वार्टरमध्ये अर्जेंटिनाच्या बचावफळीने द. आफ्रिकेचे आक्रमण हाणून पाडले. अर्जेंटिनाचा संघ पूर्ण वेळेपर्यंत एक गोल बचावण्यात यशस्वी ठ’रला. अशा प्रकारे हॉकी विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात अर्जेंटिनाने द. आफ्रिकेचा 1-0 ने पराभव के-ला आणि ग्रुप ए मध्ये तीन गुणांसह अव्वल स्थानावर पोहो चला.
🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬