| | | |

IND vs NZ : टीम इंडियाचा न्यूझीलंडवर ९० धावांनी विजय | cricket marathi
cricket marathi news डेस्क : टीम इंडियाने तिसऱ्या वनडे सामन्यात 90 धावांनी पराभूत करत मालिका 3-0 ने जिंकली. भारताने दिलेल्या 386 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा फलंदाज डेवॉन कॉनवेने दिलेली कडवी झुंज अयशस्वी ठरली. त्याने 136 धावांची खेळी के ली. भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुलने दिलेल्या पाठोपाठ धक्क्यांमुळे न्यूझीलंडची सामन्यावरची पकड कमी झाली. याचा फायदा भारतीय संघाने घेत न्यूझीलंडचा डाव 295 धावांवर गुंडाळला. त्यामुळे टीम इंडियाने सामना 90 धावांनी जिंकला. शार्दुलसह कुलदीप यादवने सामन्यात 3 बळी घे’तले. (IND vs NZ)

टीम इंडियाने दिलेल्या 386 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर फिन ऍलन खाते न उघडता बाद झा’ला. हार्दिक पंड्याने त्याला माघारी धा’डले. यावेळी संघाचीही धावसंख्या 0 हो ती. हार्दिकने या ओव्हरमध्ये तीन वाईड बॉल टाकले. (IND vs NZ)

कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या शतकांच्या जोरावर टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 9 विकेट गमावून 385 धावांचा डोंगर रचला. गिलने 78 चेंडूत 112 तर रोहितने 85 चेंडूत 101 धावा के ल्या. या दोघांशिवाय हार्दिक पांड्यानेही शेवटच्या षटकांमध्ये तडाखेबाज फलंदाजी करून 38 चेंडूत 54 धावा फटकावल्या. न्यूझीलंडकडून जेकब डफी आणि ब्लेअर टिकनर यांनी 3-3 बळी घे’तले.

26 षटकांत भारताची धावसंख्या विकेट न गमावता 212 धावा हो ती. त्यानंतर रोहित आऊट झा’ला. काही वेळाने शुभमन गिलही पॅव्हेलियनमध्ये प’रतला. विराट कोहली (36), इशान किशन (17) आणि सूर्यकुमार यादव (14) हे मधल्या फळीतील दिग्गज फलंदाज जास्त वेळ क्रीजवर टिकू शकले ना’हीत. हार्दिक आणि शार्दुल ठाकूर यांनी सातव्या विकेटसाठी 54 धावा जोडून भारताला पुन्हा रुळावर आणले.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारताची ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आ हे. टीम इंडियाने यापूर्वी किवींविरुद्ध 8 मार्च 2009 रोजी ख्राइस्टचर्चमध्ये सर्वात मोठी धावसंख्या के ली हो ती. त्यावेळी भारताने 50 षटकांत 4 गडी गमावून 392 धावा के ल्या हो’त्या.
पाहुण्या न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घे’तला. भारतीय संघात 2 बदल करण्यात आ ले, तर न्यूझीलंडने एक बदल के-ला. मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्यात आ ली असून त्यांच्या जागी उमरान मलिक आणि युझवेंद्र चहलला स्थान देण्यात आ ले. त्याचवेळी किवी कर्णधार टॉम लॅथमने शिपलेच्या जागी डफीचा समावेश के-ला.

हेही वाचा;

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *