Aliya Bhatt baby

Alia Bhatt चं बेबी बंप पाहून करीना कपूर म्हणाली हे काय ?….

लग्नाच्या 2 महिन्यांनंतरच आलिया भट्टने तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली आहे. या घोषणेनंतरच अभिनेत्रीने हॉस्पिटलमधून सोनोग्राफी करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. अशात आलियाचे सोनोग्राफीचे फोटो व्हायरल होताच सर्वांनी तिचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली. नुकताच आलिया अभिनेता आणि पती रणबीरसोबत पोज देताना दिसला. शिवाय आलियाने देखील स्वतःचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

आलियाने स्वतःचे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये, ‘the light .. is coming!’ असं लिहिलं आहे. पुढच्या दोन आठवड्यानंतर म्हणजे 9 सप्टेंबरला आलिया आणि रणबीर स्टारर ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

आलियाच्या फोटोंवर अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी कमेंट केली आहे. अभिनेता करीना कपूर खानने देखील आलियाच्या फोटोवर कमेंट करत प्रेम व्यक्त केलं आहे.

आलियाच्या फोटोवर कमेंट करत करीना म्हणाली, ‘Uffffff owning it and howwwww..Love youuu’, सध्या आलियाच्या फोटोसोबतचं करीनाची कमेंट देखील चर्चेत आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमातून पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. सिनेमातील अनेक गाणी आणि ट्रेलर रिलीज झाले आहेत. ज्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

‘ब्रह्मास्त्र’ सिनेमातून दोघांशिवाय महानायक अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय आहे. सिनेमा अयान मुखर्जीने दिग्दर्शित केला असून तो 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *