| | | |

Kho-Kho Tournament : महाराष्ट्राच्या मुलींचा सिक्कीमवर सहज विजय | cricket marathi








बन्सबेरिया (पश्चिम बंगाल), : पश्चिम बंगालमधील बन्सबेरिया (जि. होगळी) येथे सोमवारपासून सुरू झा’लेल्या 41 व्या राष्ट्रीय कुमार-मुली खो-खो स्पर्धेत (Kho-Kho Tournament) महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने सिक्कीमचा सहज पराभव करत साखळी सामन्यातील पहिला विजय मि’ळवला.

बन्सबेरीया येथील खामरपारा सिशू संघ मैदानावर हे सामने सुरू आ हे त. सकाळच्या सत्रात झा’लेल्या साखळी सामन्यात महाराष्ट्र मुलींच्या संघाने सिक्कीमचा 1 डाव 18 गुणांनी (23-5) असा धुव्वा उडवला. या सामन्यात दीपाली राठोड (4 मि. संरक्षण व 3 गुण), संपदा मोरे (3.30 मि.संरक्षण व 2 गुण), काजल शेख (3 मि. संरक्षण व 3 गुण), प्रणाली काळे (2.30 मि. संरक्षण), कल्याणी कंक (1.30 मिनीट संरक्षण व 4 गुण), सोनाली पवार (2 मिनिटे संरक्षण व 1 गुण) यांनी चांगला खेळ के-ला. पराभूत सिक्कीम संघातर्फे मारिया, मोरेशी यांनी चांगला खेळ के-ला.

उर्वरित मुलींच्या सामन्यात कर्नाटकने विदर्भचा (18-11) असा 7 गुणांनी पराभव के-ला. तसेच आसामने दादरा नगर हवेलीचा (29-2) असा एक डाव 27 गुणांनी, मणिपूरने जम्मू काश्मीरचा (17-6) असा एक डाव 11 गुणांनी, पुद्दुचेरीने चंदीगडचा (13-2) असा एक डाव 11 गुणांनी पराभव के-ला. (Kho-Kho Tournament)

कुमार गटात आसामने बिहारचा (22-8) असा 1 डाव 14 गुणांनी, केरळने दादरा नगर हवेलीचा (23-6) असा एक डाव 17 गुणांनी, चंदीगडने त्रिपुराचा (14-13) एक गुण 6.20 मिनिटे राखून विजय मि’ळवला.









 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *