| | | |

National Kabaddi Tournament : महाराष्ट्राच्या मुलांची विजयी सलामी | cricket marathi
बोकारो (झारखंड), : 32 व्या किशोर/किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत (National Kabaddi Tournament) महाराष्ट्राच्या मुलांनी गटात विजयी सलामी देताना तामिळनाडूला 41-40 असे चकविले. झारखंड राज्य कबड्डी असो.च्या विद्यमाने बोकारो येथील एमजीएम हायर सेकंडरी शाळेच्या क्रीडांगणावर आजपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आ हे.

शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या या सामन्यात मध्यांतराला महाराष्ट्र 22-26 असा 4 गुणांनी पिछाडीवर प’डला होता*. उत्तरार्धात टॉप गिअर टाकत महाराष्ट्राने तामिळनाडूच्या घशातून सामना खेचून आणला. तामिळनाडूची शेवटची चढाई असताना महाराष्ट्र 41-38 असे आघाडीवर हो ते, पण त्या चढाईत महाराष्ट्राचे दोन खेळाडू बाद झाल्याने महाराष्ट्राला एका गुणाच्या फरकावर समाधान मानावे लागले.

संदेश बिल्ले, श्रीधर कदम, दिघू दहातोंडे यांनी उत्तरार्धाच्या खेळात के-लेल्या झंझावाती चढायामुळे महाराष्ट्राने हा विजय साकारला. त्यांना विजय तारे यांनी भक्कम बचाव करीत उत्तम साथ दि ली. (National Kabaddi Tournament)

महाराष्ट्राच्या ‘फ’ गटात तामिळनाडूसह त्रिपुरा, पंजाब हे अन्य संघ आ हे त. किशोरी ‘फ’ गटात उत्तराखंड, मध्य प्रदेश, कर्नाटक यांच्याशी महाराष्ट्राची साखळी लढत होणार आ हे.

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *