PAK vs NZ Test : किवींच्या शेपटाचा पाकिस्तानला तडाखा, हेन्री-पटेलची 10 व्या विकेटसाठी विक्रमी शतकी भागिदारी | cricket marathi

cricket marathi news डेस्क : PAK vs NZ Test : टॉम ब्लंडेल (51) आणि मॅट हेन्री (नाबाद 68) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर न्यूझीलंडने मंगळवारी पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 449 धावांची मजल मा’रली. ब्लंडेल आणि हेन्री व्यतिरिक्त एजाज पटेलने 35 धावांचे योगदान दिले, तर पाकिस्तानकडून अबरार अहमदने चार आणि आगा सलमान आणि नसीम शाहने प्रत्येकी तीन बळी घे’तले. न्यूझीलंडने दुसर्या दिवसाची सुरुवात 6 बाद 309 च्या पुढे के ली आणि एकही धाव न जोडता ईश सोधी (11) ची विकेट गमावली. न्यूझीलंड ऑलआऊट होण्याच्या मार्गावर होता* पण ब्लंडेल, हेन्री आणि पटेल यांच्या खेळीने पाकिस्तानच्या अडचणी वाढवण्याचे काम के-ले.
ब्लंडेलने कर्णधार टिम साऊदीसह 31 धावा जोडल्या आणि कारकिर्दीतील आठवे अर्धशतक झळकावले. ब्लंडेलने 108 चेंडूत सहा चौकारांसह 51 धावा के ल्या तर साऊथीने 10 धावांचे योगदान दिले. अबरारने दोन्ही फलंदाजांना बाद के-ले. यानंतर किवींच्या शेपटाने शतकी भागिदारी करून पाकिस्तानला जोरदार तडाखा दिला. 9 बाद 345 अशी अवस्था झाली असता हेन्री आणि पटेल या जोडीने झुंझार खेळीचे प्रदर्शन करून संघाची धावसंख्या 449 पर्यंत पोहचवली. दोघांमध्ये विक्रमी 104 धावांची भागिदारी झाली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील 10व्या विकेटसाठी ही 27वी शतकी भागीदारी ठरली.
हेन्री-पटेल यांनी 25 षटके खेळून काढली आणि पाकिस्तान गोलंदाजांना नाकी नऊ आणले. हेन्रीने 81 चेंडूंत आठ चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 68 धावा फटकावल्या, तर अबरारला बळी पडण्यापूर्वी पटेलने 78 चेंडूत चार चौकारांसह 35 धावांचे योगदान दिले.
पाकची खराब सुरुवात
यजमान पाक संघाची सुरुवात चांगली झाली ना’ही. दुस-या दिवसाअखेर पाकिस्तानने 153 धावसंख्येवर तीन विकेट ग’मावल्या. अब्दुल्ला शफीक (19)ला मॅट हेन्रीने पटेल करवी झेलबाद के-ले. शान मसूदला (20) विकेटकीपर कॉन्वे करवी झेलबाद करून पटेलने त्याची शिकार के ली. तर बाबर आझम (24) धावबाद झा’ला. इमाम-उल-हक 74 आणि सौद शकील 13 धावांवर खेळत हो ते. पाकिस्तानचा संघ अजूनही 295 धावांनी मागे आ हे.
बाबरच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद…
याचबरोबर बाबरने सामन्यात एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद के ली. तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा धावबाद (3) होण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा पाकिस्तानी कर्णधार बनला आ हे. त्याने मुश्ताक अहमदशी (3) बरोबरी के ली. इंझमाम-उल-हक (4) पहिल्या क्रमांकावर आ हे.
🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬