| | | |

PAKvsNZ : बाबरचे शतक! पण पाकच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद | cricket marathi

cricket marathi news डेस्क : PAKvsNZ Karachi Test : पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना कराचीमध्ये खेळवला जात असून यजमान यादरम्यान पाकच्या नावावर एका लाजिरवाण्या व्रिकमाची नोंद झाली आ हे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना त्यांच्या पहिल्या दोन विकेट स्टंपिंगद्वारे प’डल्या. अशाप्रकारे क्रिकेटच्या 145 वर्षांच्या इतिहासात पहिल्या दोन विकेट स्टंपिंगद्वारे बाद होण्याची ही पहिलीच वेळ आ हे.

शफिक-शान यष्टीचीत

145 वर्षांच्या कसोटी क्रिकेटमध्ये आणि आतापर्यंत खेळलेल्या 2484 सामन्यांमध्ये कोणत्याही संघाचे पहिले दोन फलंदाज स्टंपिंग झा’लेले ना’हीत. पण हा विक्रम पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कराचीमध्ये खेळल्या जात असलेल्या कसोटीत झा’ला. डावाची सुरुवात करण्यासाठी आ लेल्या अब्दुल्ला शफिकला एजाज पटेलच्या चेंडूवर विकेटकीपर टॉम ब्लंडेलने स्टंपिंग करून माघारी धा’डले. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या शान ब्लेंडलच्या स्टंपिंगचा बळी ठ’रला. मायकल ब्रासवेलने ही विकेट घे’तली. अशाप्रकारे, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या संघाच्या पहिल्या दोन विकेट स्टंपिंगद्वारे बाद झाल्याची घटना घडली आ हे. (PAKvsNZ)

न्यूझीलंडचा कर्णधार टीम साऊदीने दिवसाच्या चौथ्या षटकात अनुभवी डावखुरा फिरकीपटू एजाझ पटेलला आक्रमणात आणले. ही रणनिती यशस्वी ठरली आणि न्यूझीलंडला झटपट यश मि’ळाले. एजाझने शफिकला चकवले. याचा फायदा घेत ब्लंडेलने चपळाईने शफिकला (7) स्टंपिंग करून तंबूत पा’ठवले. त्यानंतर अवघ्या तीन षटकांनंतर न्यूझीलंडला त्यांची दुसरी विकेट मि’ळाली. ऑफस्पिनर मायकेल ब्रेसवेलच्या गोलंदाजीवर डावखुरा फलंदाज शान मसूद बाद झा’ला. विकेटकीपर ब्लंडेलनेच त्याला स्टंपिंग करून माघारी धा’डले. त्यानंतर ब्रेसवेलने डावखुरा फलंदाज इमाम-उल-हक याचाही अडसर दूर करून न्यूझीलंडची आशादायक सुरुवात करून दि ली. मात्र, बाबर आझमने कर्णधार पदाला साजेशी खेळी करून अर्धशतक झळकावले आणि आपल्या संघाला उपाहारापर्यंत 4 बाद 129 धावांपर्यंत पोचवले.

बाबर आझमची सर्वोत्तम फलंदाजी

बाबर आझम फलंदाजीसाठी आ ला तेव्हा पाकिस्तानी संघाने 19 धावांवर दोन विकेट ग’मावल्या हो’त्या. काही वेळाने इमाम-उल-हक (24) देखील तंबूत प’रतला, ज्यामुळे पाकिस्तानची अवस्था 3 बाद 48 अशी झाली. अशा परिस्थितीत बाबरने सौद शकील (22) सोबत 62 धावा जोडून पाकिस्तानी संघाचा डाव सा’वरला. शकील बाद झाल्यानंतर बाबर आझमने माजी कर्णधार सर्फराज अहमदसोबत पाचव्या विकेटसाठी शानदार शतकी भागीदारी मां-डली. बाबरनेही 155 चेंडूत 10 चौकार आणि 1 षटकार लगावत शतक पूर्ण के-ले. त्याचे हे नववे कसोटी शतक ठरले. (PAKvsNZ)

पाँटिंग-युसूफचा विक्रम मोडला

या शतकी खेळीसह बाबर आझम एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक 50 किंवा त्याहून अधिक धावा करणारा फलंदाज बनला आ हे. बाबरला 2022 मध्ये 25 वेळा 50+ धावसंख्येचा टप्पा पार करण्यात यश आ ले आ हे. 2005 मध्ये, रिकी पॉन्टिंगने 24 वेळा 50+ धावा के ल्या हो’त्या. यंदाच्या कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तान संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली असली तरी बाबर आझमचा सुवर्ण फॉर्म अबाधित रा’हिला आ हे. (PAKvsNZ)

त्याचबरोबर बाबरने या वर्षात नऊ कसोटी सामन्यांमध्ये 1000 हून अधिक धावा के ल्या आ हे त. बाबरशिवाय या कॅलेंडर वर्षात केवळ तीन फलंदाजांना कसोटीत हजार धावांचा आकडा गाठण्यात यश आ ले. बाबर हा आता एका कॅलेंडर वर्षात पाकिस्तानसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला असून त्याने 2006 मध्ये एकूण 2435 धावा करणाऱ्या मोहम्मद युसूफला मागे टाकले आ हे. (PAKvsNZ)

जो रूट आणि इंझमाम यांनीही मागे टाकले

बाबर या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठ’रला आ हे. त्याने या बाबतीत इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटला (1,098) मागे टाकले आ हे. बाबरने यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये अकराव्यांदा पन्नास किंवा त्याहून अधिक धावांचा आकडा गाठला आ हे. यासह बाबर एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक 50+ कसोटीत धावा करणारा पाकिस्तानी कर्णधार बनला आ हे. त्याने 1995, 2000 आणि 2005 या कॅलेंडर वर्षांमध्ये 10 वेळा कसोटी क्रिकेटमध्ये 50+ धावा करणाऱ्या इंझमाम-उल-हकला मागे टाकले.

बाबर-सर्फराजने पाकिस्तानला सावरले

बाबर आझमचे शतक आणि सर्फराज खानच्या अर्धशतकाच्या जोरावर पाकिस्तानने कराची कसोटीत न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाच विकेट्सवर 317 धावा के ल्या. बाबर आझम नाबाद 161 आणि आगा सलमान 03 धावांवर नाबाद आ हे त.

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घे’तला. अब्दुल्ला शफीक (07 धावा) आणि शान मसूद (03 धावा) लवकर बाद झा’ले. त्याचवेळी इमाम-उल-हक (24 धावा) आणि सौद शकील (22 धावा) यांना’ही मोठी खेळी करता आ ली ना’ही. 67 धावांच्या स्कोअरवर पाकिस्तानने चार विकेट ग’मावल्या, पण त्यानंतर कर्णधार बाबर आझम आणि तीन वर्षे 11 महिन्यांनंतर संघात पुनरागमन करणाऱ्या सरफराज अहमद यांनी पाकिस्तानचा डाव सांभाळला.

दोन्ही फलंदाजांनी शतकी भागीदारी करत पाकिस्तानला सामन्यात पुनरागमन करून दिले. बाबर आझमने कसोटी क्रिकेटमधील नववे शतक झळकावले आणि तो या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठ’रला. त्याचवेळी सर्फराज अहमदने आपल्या 50 व्या कसोटी सामन्यात 11 वे अर्धशतकही झळकावले. दोन्ही फलंदाजांनी 196 धावांची भक्कम भागीदारी के ली. सर्फराज अहमदचे शतक हुकले आणि तो 86 धावा करून बाद झा’ला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाकिस्तानने पाच विकेट्सवर 317 धावा के ल्या आ हे त. बाबर आझम आणि आगा सलमान यांच्यात 11 धावांची नाबाद भागीदारी आ हे. न्यूझीलंडकडून एजाज पटेल आणि मायकल ब्रेसवेलने प्रत्येकी दोन बळी घे’तले. कर्णधार टीम साऊदीला एक विकेट मि’ळाली.

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *