| | | |

Rishabh Pant Accident : तीन दिवसांतील 5737 किमीचा प्रवास ऋषभ पंतला भोवला! | cricket marathi








cricket marathi news डेस्क : भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंतचा शुक्रवारी अपघात झा’ला. दिल्लीहून उत्तराखंडला जात असताना रुरकी येथे त्यांची कार दुभाजकाला धडकली. कार अपघातात पंत थोडक्यात बचावला. दुर्घटनेत पंत गंभीर जखमी झा’ला असून त्याच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली आ हे. अपघातानंतर पंतची मर्सिडीज जीएलई कार पेट घे’तला. आणि काही क्षणातच जळून खाक झाली. (Rishabh Pant Accident)

पंत नुकताच बांगला देशचा दौरा आटोपून भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि इतर मित्रांसोबत ख्रिसमस साजरा करण्यासाठी दुबईत गे’ला होता*. भारतात परतल्यानंतर तो कुटुंबियांना भेटण्यासाठी दिल्लीतून आपल्या घरी निघाला. तो स्वत: कार चालवत होता*. त्याच्या शिवाय इतर कुणीही कारमध्ये नव्हते. दरम्यान, पंतने गेल्या तीन दिवसात बांगलादेश ते दुबई आणि दुबई ते भारत असा 5 हजार 737 किलोमीटरचा प्रवास के-ला होता*. त्यानंतर तो रात्री कार चालवत घरी जात होता*. कारने वेग पकडला त्यातच पंतला डुलकी आ ली आणि घात झा’ला. क्षणार्धात हो’त्याचे नव्हते झा’ले. कारवरचे नियंत्रण सुटल्याने ती दुभाजकावर आदळली आणि पलटी झाली. प्रसंगावधान दाखवून घटनास्थळी असलेल्या काही लोकांनी अपघातग्रस्त कारमधून बाहेर पदण्यास पंतला मदत के ली. त्यात ते यशस्वी झा’ले. तो बाहेर येताच कारने अचानक पेट घे’तला.

अपघाताच्या काही वेळापूर्वी त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर के-ला होता*. ज्यामध्ये तो काम करताना दिसत होता*. बांगलादेश दौऱ्यावरून ३५४३ किलोमीटचा प्रवासकरून पंत थेट दुबईला भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी इतर मित्रांसोबत ख्रिसमस पार्टी करण्यासाठी पोहो चला होता*. धोनीसोबत पार्टी के ल्यानंतर पंत दिल्लीला रवाना झा’ला. काल दुबईवरून दिल्लीला २९१४ किलोमीटरचा प्रवास पंतने काल के-ला.

अपघातानंतर क्रिकेटपटू पंतला रुरकी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आ ले. तेथील प्राथमिक उपचारानंतर त्याला डेहराडून येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आ ले आ हे. बीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, पंतला कपाळाला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आ हे. त्याची प्रकृती स्थिर आ हे. गंभीर दुखापत झाली असून त्याच्या जीवाला कोणताही धोका ना’ही आ हे.

हेही वाचा;









 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *