| | | |

Shafali Verma : 4,4,4,4,4,6… भारतीय कर्णधाराने आफ्रिकन गोलंदाजांना चोपले, एका ओव्हरमध्ये वसूल के ल्या 26 धावा | cricket marathi
cricket marathi news डेस्क : शेफाली वर्माच्या (Shafali Verma) नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाने 2023 च्या अंडर-19 टी 20 विश्वचषकात विजयी सलामी दि ली. द. आफ्रिकेविरुद्धच्या या सामन्यात टीम इंडियाने 7 विकेट्सच्या मोठ्या फरकाने विजय मिळवत वर्चस्व गाजवले. या सामन्यात श्वेता सेहरावतने भारतासाठी सर्वाधिक 92 धावांची नाबाद खेळी साकारली. यादरम्यान कर्णधार शेफाली वर्माने हिने आपल्या वादळी खेळीने चाहत्यांचे मनोरंजन के-ले. शेफालीने द. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 281.25 च्या स्ट्राइक रेटने 16 चेंडूत 45 धावा ठोकल्या. तिने आपल्या खेळीत एकूण 9 चौकार आणि 1 षटकार लगावला. यादरम्यान शेफालीने एका षटकात 5 चौकार आणि 1 षटकार मारत एकूण 26 धावा वसूल के ल्या.

5 षटकांनंतर भारताची धावसंख्या 44 हो ती. पॉवरप्लेचे शेवटचे षटक टाकणासाठी नथाबिसेंग निनीच्या हाती चेंडू सोपवण्यात आ ला. स्टाईकवर भारतीय संघाची कर्णधार शेफाली वर्मा (Shafali Verma) हो ती. तिने ओव्हरच्या पहिल्याच चेंडूपासून जोरदार प्रहार करण्यास सुरुवात के ली आणि लागोपाठ 5 चौकार लगावले. तर शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला. यानंतर पॉवरप्ले संपल्यानंतर संघाची धावसंख्या थेट 70 पर्यंत पोहचली. दरम्यान, शेफालीच्या त्या आक्रमक फलंदाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आ हे.

द. आफ्रिकेच्या अंडर-19 महिला संघाची कर्णधार ओलुहले सिओ हिने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घे’तला. संघाने 20 षटकांत 5 गडी गमावून 166 धावा के ल्या. सायमन लॉरेन्सने 44 चेंडूत 61 धावांची खेळी के ली. त्याचवेळी मॅडिसन लँडसमॅनने 32 धावा के ल्या. अॅलेन्ड्री रेन्सबर्गने 23 धावा के ल्या. भारताकडून शेफाली वर्माने (Shafali Verma) 2, तर शबनम आणि पार्श्वी चोप्राने प्रत्येकी एक विकेट घे’तली.

167 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार शेफाली वर्मासह श्वेता सेहरावतने संघाला झंझावाती सुरुवात करून दि ली. श्वेताने आपल्या खेळीत 20 चौकार मा’रले आणि तिला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आ ला. भारताचा पुढील सामना 16 जानेवारीला युएई विरुद्ध खेळवला जाणार आ हे.

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *