| | | |

Shahid Afridi : शाहिद आफ्रिदीचे पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुनरागमन, मि’ळाली मोठी जबाबदारी | cricket marathi

cricket marathi news डेस्क : पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये पुनरागमन के-ले आ हे. आफ्रिदी यावेळी निवड समितीमध्ये काम करताना दिसणार आ हे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) शनिवारी (दि.२४) त्याची राष्ट्रीय निवड समितीच्या अंतरिम अध्यक्षपदी नियुक्ती के ली. शाहिद आफ्रिदी शिवाय अब्दुल रझ्झाक, राव इफ्तिखार अंजुम आणि हारून राशिद यांचा सुद्धा या समितीमध्ये समावेश करण्यात आ ला आ हे. (Shahid Afridi)

पाकिस्तान क्रिकेटमध्ये काही दिवसांपूर्वी मोठे बदल करण्यात आ ले आ हे त. काही दिवसांपूर्वी रमीज राजा यांना ‘पीसीबी’च्या अध्यक्षपदावरून काढून टाकण्यात आ ले हो ते. तर पीसीबीच्या अध्यक्षपदी नजम सेठी यांची नियुक्ती करण्यात आ ली हो ती. त्यानंतर आता निवड समितीमध्येही मोठे बदल करण्यात आ ले आ हे त. (Shahid Afridi)

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी म्हणाले की, “शाहिद आफ्रिदी आक्रमक खेळाडू हो ते. त्यांच्याकडे दोन दशकांचा अनुभव आ हे. शाहिद आफ्रिदी पाकिस्तानच्या संघाला पुढे घेऊन जाण्याचे काम करतील. पुढील काळात संघासमोर असणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी पाकिस्तानच्या संघाला तयार करतील.” (Shahid Afridi)

शाहिद आफ्रिदीची निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्याने ‘पीसीबी’चे आभार मानले आ हे त. आफ्रिदी म्हणाला, “माझ्यावर निवड समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली त्यासाठी मी ‘पीसीबी’चा आभारी आ हे. आम्ही पुन्हा एकदा संघात बदल करून विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील कामगीरी करु.” (Shahid Afridi)

दरम्यान, पाकिस्तानचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात पोहचण्याच्या शर्यतीतून बाहेर प’डला आ हे. पाकिस्तानचा संघ आता न्यूझीलंडविरूद्ध कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आ हे. त्यामुळे न्यूझीलंड विरुद्ध विजय मिळवण्याचे आव्हान पाकिस्तानसमोर असणार आ हे.

शाहिद आफ्रिदी हा पाकिस्तानच्या सर्वोकृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आ हे. त्याने पाकिस्तानकडून ३९८ एकदिवसीय सामन्यांत ८०६४ धावा के ल्या आ हे त. तर ९९ टी २० सामन्यात १४१६ धावा त्याच्या नावावर आ हे त. (Shahid Afridi)

हेही वाचलतं का?

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *