| | | |

Shubman Gill 1000 : शुबमन गिलची विक्रमाला गवसणी, शतक ठोकून बनला एक हजारी मनसबदार! | cricket marathi
cricket marathi news डेस्क : Shubman Gill 1000 : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारतीय फलंदाज शुबमन गिलने वनडेतील तिसरे शतक झळकावले. हैदराबादच्या मैदानावर त्याने 87 चेंडूत 14 चौकार आणि दोन षटकारांसह तीन अंकी धावसंख्या गाठली. गिलचे हे सलग दुसरे वनडे शतक ठरले. तत्पूर्वी, 15 जानेवारी रोजी श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात उजव्या हाताच्या सलामीवीराने शतकी खेळी साकारली हो ती. यासह आजच्या सामन्यात त्याने वन-डेतील एक हजार धावांचा पल्ला गाठला.

गिल हा वन-डे सामन्यात डावाच्या बाबतीत सर्वात जलद 1000 धावा करणारा भारतीय फलंदाज बनला आ हे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वन-डे पूर्वी गिलने 18 एकदिवसीय सामन्यांमध्ये 894 धावा के ल्या हो’त्या. त्याला 1000 धावा पूर्ण करण्यासाठी फक्त 106 धावांची गरज हो ती. अखेर बुधवारच्या सामन्यात त्याने हा टप्पा गाठला आणि हजार धावा पूर्ण के ल्या.

याचबरोबर त्याने विराट कोहली आणि शिखर धवन यांना मागे टाकले. या दोघांनी वन-डे क्रिकेटच्या 24 डावांमध्ये 1000 धावा पूर्ण के ल्या हो’त्या. दुसरीकडे, गिलने केवळ 19 डावांमध्ये ही मजल गाठली आ हे. यासह तो इतक्या कमी डावांमध्ये 1000 धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज बनला आ हे. या दरम्यान त्याची फलंदाजीची सरासरी 66 पेक्षा जास्त राहिली असून यात त्याच्या बॅटने तीन शतके आणि पाच अर्धशतकेही के ली आ हे त.

किवींविरुद्ध सावध सुरुवात

गिलने रोहित शर्मासोबत डावाची सावधपणे सुरुवात के ली. नंतर चांगले फटके मारत धावफलक हलता ठेवला. एकीकडे रोहित, विराट, सूर्या, ईशान किशनसारखे मोठे फलंदाज तंबूत परतले असताना गिलने मात्र जबाबदारीने संघाला सावरले. (Shubman Gill 1000)

नेटिझन्स या 23 वर्षीय खेळाडूच्या वन-डे फॉर्मेटमधील उत्कृष्ट प्रदर्शनाचे कौतुक करत आ हे त. माजी क्रिकेटपटू आणि खेळातील तज्ञांनी 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतासाठी तिसरे शतक झळकावल्याबद्दल गिलचे कौतुक करण्यासाठी सोशल मीडियावर स्तुतीसुमने उधळली. (Shubman Gill 1000)

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *