Sleeping positions in marathi

ही झोपण्याची पद्धत सांगते तुमचा स्वभाव; पोटावर झोपणारे बिनधास्त तर पाय दुमडून

Samudrik Shastra: ज्योतिष शास्त्रानुसार व्यक्तीच्या या सवयी आणि शारीरिक लक्षण पाहून स्वभाव सांगणाऱ्या विद्येला सामुद्रिक शास्त्र असे संबोधले जाते.

Sleeping positions in marathi: प्रत्येकाची झोपण्याची पद्धत वेगवेगळी असते. तुमच्या झोपण्याच्या पद्धतीवरून व वेळेवरून तुमचे स्वास्थ्य ठरत असते.

मात्र सामुद्रिक शास्त्रानुसार तुमची झोपण्याची पद्धत आणि तुमचा स्वभाव कसा आहे हे सुद्धा सांगते. ज्योतिष शास्त्रानुसार व्यक्तीच्या सवयी आणि शारीरिक लक्षण पाहून स्वभाव सांगणाऱ्या विद्येला सामुद्रिक शास्त्र असे संबोधले जाते. प्रत्येक व्यक्ती त्याच्या सवयीनुसार झोपत असतो.

झोपताना मनस्थिती ही चांगली असेल, तर चांगली झोप लागते. मात्र, मनात चांगले वाईट विचार घुटमळत असतील तर पूर्ण रात्र कूस बदलण्यातच ही जाते. आज आपण काही सामान्य सवयी तुमचा स्वभाव कसा अधोरेखित करतात हे जाणून घेणार आहोत.

सावधान पोझिशन

अगदी क्वचितच या पद्धतीची मंडळी पाहायला मिळतात ज्यांना झोपताना बिलकुल हालचाल ही करायची सवय नसते. अगदी सावधान स्थितीत हात पाय सरळ असताना झोपणे हे गंभीर स्वभावाचे लक्षण आहे. या मंडळींना कामात गुंतून राहणे आवडते. अशा व्यक्तींमध्ये निर्णय घेताना लवचिकता ही दिसून येत नाही.

दोन्ही पायांची घडी

दोन्ही पायांची घडी व हात सुद्धा डोक्यापाशी घट्ट धरून झोपणाऱ्या व्यक्ती या भित्र्या स्वभावाच्या असतात असे मानले जाते. अशा व्यक्ती या फारच लाजाळू व मनाने हळवी असतात. एखाद्या लहान बाळाप्रमाणेच झोपण्याची ही पद्धत असते, त्यामुळे निरागस बाळाचे गुण अशा व्यक्तींमध्ये दिसतात.

मॅरेथॉन पोझिशन

अशा पद्धतीने झोपताना व्यक्ती खालचा पाय सरळ व वरचा पाय हा गुडघ्यापासून मोडलेल्या अवस्थेत ठेवतात. ही सर्वात कॉमन अशी पोजिशन आहे. एखाद्या धावपटूसारखी ही पोझिशन व्यक्तीचा सतत तयार असणारा स्वभाव दर्शवतो. या व्यक्तींना रिस्क घेणे आवडते, फार क्वचितच ही मंडळी स्तब्ध पाहायला मिळतात. मात्र अशा व्यक्तींना स्वस्थ झोप लागत नाही, त्यांना याच पोजिशन मध्ये कूस बदलण्याची सवय असते.

पोटावर झोपणे

या व्यक्ती स्वतःच्या विश्वात रममाण असतात, अशा व्यक्तींना कोणीही टीका केलेली आवडत नाही. या व्यक्ती लाजाळू नसल्या तरी इतरांना आपल्यापासून लांब ठेवतात जेणेकरून त्यांना स्वतःचा वेळ जगून घेता येईल. वास्तविक ही पोझिशन झोपण्यासाठी अगदी चुकीची आहे. पाठ- कंबर दुखी ते अपचन असे अनेक विकार यातूनच उद्भवतात.

सामावून घेणारी पोझिशन

हात डोक्याच्या वर व पाय पसरून झोपणे हे डोक्याने शांत असणाऱ्या व्यक्तीचे लक्षण आहे. या व्यक्ती प्रत्येक गोष्ट स्वतः करण्याचा प्रयत्न करतात. यांना इतरांना मदत करायला खूप आवडते.

तुमच्या झोपण्यावरून तुमचा स्वभावच नाही तर तुमची प्रकृती सुद्धा ठरते. तुम्हाला सतत कंबरदुखी, सांधे दुखी असे त्रास सतावत असतील तर तुम्हाला झोपण्याची पद्धत बदलण्याची गरज आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *