| | | |

United Cup Tennis : अमेरिका, इटली अंतिम फेरीत | cricket marathi








युनायटेड कप टेनिस (United Cup Tennis) स्पर्धेत सिडनी ऑलिम्पिक पार्कच्या केन रोजवाल टेनिस स्टेडियममध्ये अमेरिकेच्या टेलर फ्रीटजने पोलंडच्या हुबर्ट हरकाझचा अटीतटीच्या लढतीत 7-6, 7-6 असा पराभव के-ला. हाच कित्ता गिरवत मॅडिसन कीजने पोलंडच्या लीनेटला 6-4, 6-2 अशी धूळ चारली.

दोन संघांतील शेवटच्या, मिश्र दुहेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या पेगुला आणि फ्रीटज जोडीने पोलंडच्या रोसोलस्का व कुबॉट यांचा 6-7, 6-4, 10-6 असा फडशा पाडून अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश के-ला. अमेरिकेने पाचही सामने जिंकून पोलंड संघास पुरते निष्प्रभ के ल्याचे चित्र पाहायला मि’ळाले.

दणदणीत विजयाबाबत प्रतिक्रिया देताना जेसीका पेगुला म्हणाली, 5-0 असा विजय मिळविणे सोपे नव्हते. आम्ही संघ म्हणून एकोप्याने आणि पूरकपणे खेळलो. अर्थातच अंतिम सामना देखील जिंकण्यासाठी उत्सुक आहो-त. दुसर्‍या उपांत्य फेरीतील ग्रीस वि. इटली सामन्यातील पहिल्या लढतीत दोन तगड्या खेळाडूंतील लढत प्रेक्षणीय झाली. (United Cup Tennis)

ग्रीसच्या स्तिफनोस स्तितीपासने मॅटओ बेरेट्टिनीचा 4-6, 7-6, 6-4 असा पराभव करण्यात यश मि’ळविले; परंतु नंतर इटलीच्या लुसिया ब्रॉनझेटी हिने ग्रीसच्या व्हेलन्टिनी ग्रामट्टीकोपो हिला 6-2, 6-3 असे हरवून इटलीचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित के-ला. आज अंतिम सामना असून 18 देशांच्या सांघिक विजेतेपणाचा बहुमान कोण पटकावेल हे सिद्ध होई ल.

उदय बिनीवाले









 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *