| | | |

United Cup Tennis : राफेल नदाल, अलेक्झांडर झ्वेरेव पुन्हा गारद | cricket marathi

थेट ऑस्ट्रेलियातून – उदय बिनीवाले 

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या युनायटेड कप टेनिस स्पर्धेत (United Cup Tennis) ज्येष्ठ आणि श्रेष्ठ राफेल नदाल तसेच जगातील क्र. 3 चा खेळाडू झ्वेरेव सलग दोन वेळा पराभूत झाल्याने टेनिस रसिकांना आश्चर्याचा धक्का बसला आ हे.

स्पर्धेत आज अमेरिकेने निर्णायक आघाडी घे’तली. विशेष म्हणजे टेलर फ्रीटजने झ्वेरेव्ह ला 6-1, 6-4 असे सहज हरविले. मॅडिसन किजने जर्मनीच्या ज्यूल नेमीअरला 6-2, 6-3 असे सहज नमविले. त्यामुळे अमेरिकेचा संघ शहर गटात अंतिम फेरीत पोहो चला आ हे.

आजच्या धक्कादायक निकालामध्ये ऑस्ट्रेलियाच्या अलेक्स डी मिनॉरचा विजय महत्त्वाचा ठ’रला. त्याच्याविरुध्द नदाल 6-3, 1-6, 5-7 असा पराभूत झा’ला.

जगातील क्र.1 पोलंडच्या इगा स्विआटेकने श्रेष्ठ आणि अनुभवी बेलिंडा बेन्सिकला 6-3, 7-6 असे नमविले. अन्य उत्कंठापूर्वक सामन्यात ग्रीस वि. बेल्जियम सामन्यात स्तिफनोस स्टीतिपासने डेव्हिड गोफिनचा 6-3, 6-2 असा धुव्वा उडविला. (United Cup Tennis)

सिडनी, पर्थ, ब्रिस्बेन येथून उपांत्य पूर्व फेरीत कोणते संघ पोहोचतील याचे चित्र स्पष्ट होऊ लागले आ हे. पर्थ येथे ‘अ’ गटात बल्गेरिया आणि ग्रीस तर ‘फ’ गटात फ्रान्स आणि क्रोएशिया अग्रस्थानी आ हे त. ब्रिस्बेन येथे ‘ब’ गटात स्वित्झर्लंड आणि पोलंड यांनी तर ‘इ’ गटात ब्राझील आणी इटली आघाडीवर आ हे त. सिडनी येथे ‘क’ गटात अमेरिका आणी झेकोस्लोव्हाकिया याबरोबर ‘ड’ गटात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांची सरशी दिसून ये-ते.

हेही वाचा…

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *