| | | |

United Tennis Cup : अमेरिकेने प’टकावला युनायटेड टेनिस चषक | cricket marathi
युनायटेड चषक जागतिक सांघिक टेनिस विजेता स्पर्धेची आज सिडनी येथे सांगता झाली. अमेरिकेच्या पुरुष आणि महिला खेळाडूंनी बहारदार व उच्च दर्जाचा खेळ करून युनायटेड टेनिस चषकावर (United Tennis Cup) नाव कोरले.

अमेरिकेच्या जेसिका पेगुलाने विजयाची मुहूर्तमेढ रोवली. इटलीची मार्टिना ट्रेविसन दीड तासात 6-4, 6-2 अशी पराभूत झाली. त्याच पावलावर पाऊल ठेवून फ्रँसिस टीएफोने इटलीच्या लोरेंझो मुसेट्टी विरुद्ध 6-2 अशी आघाडी घे’तली. तथापि मुसेट्टीने स्नायू दुखापतीमुळे सामना सोडून दिला.

तिसरा सामना निर्णायक ठ’रला (United Tennis Cup)

अमेरिकेच्या टेलर फ्रीटजने इटलीच्या बलाढ्य मेटेओ बेरेट्टीनीला 7-6, 7-6 अशा 2 तास 16 मिनिटांच्या दीर्घ लढतीनंतर हरवून अमेरिकेचे स्थान अजिंक्य करण्यावर मोहर उमटविली. अमेरिकेने सामने गांभीर्याने घे’तले असे निश्चितपणे म्हणावे लागे ल. निकाल स्पष्ट असूनही अमेरिकेच्या मेडिसन कीजने ल्यूसिया ब्रॉनझेट्टीचा 6-3, 6-2 असा फडशा पाडला आणि अमेरिके-ला 4-0 अशी जबरदस्त आघाडी मिळवून दि ली.

उदय बिनीवाले

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *