घरात लावा फाऊंटन अथवा वॉटरफॉल, येईल खूप पैसा

Vastu shastra: money making हे तुम्हाला माहित आहे का ? वास्तुनुसार घरात पाण्याचे कारंजे किंवा फाऊंटन ठेवल्याने सकारात्मकता येते. यामुळे घरात सुख-समृद्धी येते. तसेच धनाचा अभाव राहत नाही. मात्र हे ठेवताना योग्य स्थान तसेच योग्य दिशेचे ध्यान ठेवले पाहिजे.

र सजवण्यासाठी तसेच आकर्षक दिसावे यासाठी आपण अनेक विविध गोष्टींचा वापर करत असतो. वास्तुमध्येही (vastu in marathi) घराच्या सजावटीशी संबंधित काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.

यामुळे घरात सकारात्मक उर्जेचा (positive energy) वास असतो आणि सुख-समृद्धी कायम राहते. वास्तुशास्त्रात वाहते पाणी हे शुभ मानले गेले आहे. यामुळे निरंतर वाढत्या जीवनाची तुलना केली जाते.

वास्तुनुार घरात जलतत्व असणे गरजेचे असते. यासाठी घरात वॉटरफॉल अथवा फाऊंटन ठेवण्याचा सल्ला हा दिला जातो. घरात वॉटरफॉल तसेच फाऊंटन ठेवल्याने प्रगतीचे नवे मार्ग खुले होतात.

तसेच पैशांची कमतरता जाणवत नाही. मात्र याचे लाभ तेव्हाच मिळतात जेव्हा तुम्ही हे वास्तुनुसार योग्य दिशेला ठेवतात. know the benefit of water fountain in home

घरात फाऊंटन ठेवण्याचे महत्त्व

वास्तुमध्ये जलतत्व अथवा पाण्याशी संबंधित गोष्टींना महत्त्व आहे. मात्र हे लक्षात ठेवा की हे पाणी एका ठिकाणी साचलेले नसावे तर ते वाहते असले पाहिजे. कारण वाहते पाणी हे गतीशीलतेचे प्रतीक असते. यामुळे पॉझिटिव्ह एनर्जीचा संचार होतो. यामुळे घरात वॉटरफॉल अथवा फाऊंटन लावले पाहिजे.

घरात वॉटरफॉल लावण्याचे फायदे

घरात पाण्याचे कारंजे अथवा वॉटरफॉल ठेवण्याने अनेक लाभ मिळतात. वास्तुनुसार यामुळे धन प्राप्तीचे मार्ग खुले होतात. वाहते पाणी पाहून व्यक्तीचे मन आनंदित होते आणि तणावही दूर होतो. बाजारात अनेक प्रकारचे पाण्याचे कारंजे मिळतात जसजसे विविध धातूंचे कारंजे, चीनी मातीचे कारंजे, टेबलटॉप कारंजे, लटकणारे कारंजे . या सर्वांचे प्रभाव आणि फायदे असतात.

कुठे ठेवावे वॉटर फाऊंटन

वॉटर फाऊंटन अथवा कारंजे ठेवण्यासाठी दिशा आणि स्थान माहीत असणे हे गरजेचे आहे. तरच याचे लाभ मिळतात. वास्तुनुसार घराच्या उत्तर-पूर्ण, उत्तर-दक्षिण पूर्व दिशेला कारंजे लावणे चांगले मानले जाते. या गोष्टीचे ध्यान ठेवा की फाऊंटन कधीही किचनमध्ये ठेवू नका. कारण किचन अग्नीतत्वाशी संबंधित असते आणि फाऊंटन जलतत्वाचे प्रतीक असते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *