Weight Loss: तुमचे वजन कमी करू शकते केळी, रोज करा हे काम ; करा वजन कमी

Weight loss tips in marathi: वजन वाढण्यासाठी केळी खाण्याचा सल्ला तर तुम्हाला अनेकांनी दिलाच असेल. पण याच केळींमुळे तुमचे वजन कमी करता येऊ शकते हे तुम्हाला माहिती आहे का?

Weight Loss: तुमचे वजन कमी करू शकते केळी, रोज करा हे काम ; करा वजन कमी

Banana for Weight Loss: Health केळी खाल्ल्याने सुद्धा वजन कमी केले जाते. अनेकदा खासकरुन मुलींना असे वाटते की, बनाना शेक किंवा केळी खाल्ल्याने वजन वाढते आणि त्यामुळे मुली केळी खाणं शक्यतो नेहमी टाळतात. मात्र, प्रत्यक्षात तसे नाहीये.

अनेक न्यूट्रिशनिस्ट वजन कमी करण्यासाठी केळी खाण्याचा सल्ला देत असतात. प्रत्यक्षात केळी खाल्ल्याने वजन वाढते सुद्धा. मात्र, योग्य प्रमाणात केळी खाल्ली तर तुम्ही वजन कमी देखील करु नक्कीच करू शकता. जाणून घेऊयात केळी कुठल्या प्रमाणात खाणे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. (weight loss tips in marathi eat bananas to reduce your fat, health tips in marathi)

फायबर
केळीमध्ये आढळणारे सोल्युबल फायबर हे वजन कमी करण्यासाठी नेहमी मदत करतात. फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे केळी खाल्ल्यानंतर तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटते. परिणामी आपण जास्त केळी खाणे टाळतो आणि त्यासोबतच खाण्याची इच्छाही होत नाही. त्यासोबतच फायबर हे आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते. तसेच पचन प्रक्रिया सुधारते आणि त्यामुळे लठ्ठपणाची शक्यताही कमी होते.

प्री-वर्कआऊट फूड
केळी हे एक चांगले प्री-वर्कआऊट फूड (banana for gym) देखील आहे. मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि फोलेटने भरपूर असलेले केळी वजन वाढण्याच्या भीती न बाळगता तुम्ही खाऊ शकता. केवळ साधे केळी किंवा ओट्समध्ये केळी टाकून किंवा मिल्क शेक बनवून सुद्धा खाऊ शकता.

मधुमेही रुग्णांना
ज्या व्यक्तींना मधुमेहाचा त्रास आहे अशा व्यक्तींनी वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी केळी नेहमी खाऊ शकतात. केळी खाल्ल्याने शरीर ग्लुकोजवर सुरळीत प्रोसेस सुरू करते आणि त्यामुळे वजन देखील कमी होण्यास मदत होते.

कमी कॅलरीज
केळी खाल्ल्याने तुम्ही तुमचे पोट दिवसभर भरलेले ठेवू शकता आणि तुम्ही कमी कॅलरीज देखील खाऊ शकता. यासाठी केळीसोबत दही, पीनट बटर किंवा अंडी देखील नक्कीच खाऊ शकता. हे तुमच्यासाठी पूर्ण अन्न असेल आणि तुमच्या दिवसाच्या सुरुवातीला नेहमी चालना देईल.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *