| | | |

World Test Championship च्‍या अंतिम सामन्‍यात कशी पोहचेल टीम इंडिया, जाणून घ्‍या समीकरण | cricket marathi
cricket marathi news डेस्‍क : भारताने बांगलादेश विरुद्धची कसोटी मालिका 2-0 अशी जिंकली आ हे. या दमदार कामगिरीमुळे टीम इंडियाला World Test Championship च्‍या अंतिम सामन्‍यात धडक मारण्‍याची संधी आ हे. या कामगिरीमुळे गुणतालिकेत भारत दुसर्‍या क्रमांकावर  कायम आ हे. आता World Test Championship च्‍या फायनलमध्‍ये धडक मारण्‍यासाठी असणार्‍या समीकरणाविषयी जाणून घेवू या.

भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा तीन विकेटने पराभव करत मालिका २-० ने जिंकली. या कामगिरीमुळे भारत २०२२-२३ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर कायम रा’हिला आ हे; पण आता भारताला अंतिम फेरी गाठायची अ’सेल तर ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका ४-० किंवा ३-० अशी जिंकण्याचा प्रयत्न करावा लागणार आ हे.

World Test Championship : टीम इंडियाला इतर संघांपेक्षा अधिक संधी

भारताला World Test Championship च्‍या अंतिम फेरी गाठायची अ’सेल तर ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकण्याचा प्रयत्न करावा लागणार आ हे. तसेच  दक्षिण आफ्रिका-ऑस्ट्रेलिया या संघासोबत सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या निकालावरही भारताला अवलंबून राहावे लागे ल. कारण गुणतालिकेत  तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका तर  श्रीलंकेचा संघ चौथ्या क्रमांकावर आ हे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतमध्ये ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर आ हे. कसोटी मालिका जिंकण्याची ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी ७६.९२ आ हे, तर भारताची विजयाची टक्केवारी ५८.९३ आ हे, जी जवळपास ५९ टक्के आ हे. तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका आ हे, ज्याची विजयाची टक्केवारी ५४.५५ आ हे.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत भारताची पुढील कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाविरुद्ध आ हे, फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये भारतात ऑस्ट्रेलिया संघ चार कसोटी सामने खेळणार आ हे. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत आपलं स्थान अबाधित ठेवण्यासाठी टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी करावी लाग‍णार आ हे.

हेही वाचा : 

 

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *